शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रानं नाकारलं, आता बिहारची जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल, भाजपचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:04 IST

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली.

लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले. या निवडणुकीत महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झाले. आता बिहार आणि इतर राज्यांमध्येही असाच प्रकार घडणार, असे राहुल गांधी म्हणाले. यावर बोलताना महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधींनी निवडक आकडे वाचून देशाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करणे थांबवावे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारले. आता बिहारमधील जनताही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल, या भितीपोटी राहुल गांधी एकदम गडबडून गेले आहेत. 

"महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. पुढील निवडणुकीतही हा विश्वास अतूट राहील. वारंवार खोटे बोलून तुम्ही राज्यातील जनतेच्या जनादेशाचा अपमान करत आहात. जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही", असे बावनकुळे म्हणाले.

"एप्रिल २००९ ला लोकसभा निवडणुकीत ७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले होते, तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? असे प्रत्युत्तर राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार वाढीवर काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर आकड्यांनिशी प्रत्युत्तर दिले.  "२००४, २००९ ला काँग्रेस जिंकली तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत. आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात", अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेRahul Gandhiराहुल गांधीMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर