विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांसह इतर विविध कारणांमुळे वादळी ठरत आहे. काल बुधवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. गोपिचंड पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिविगाळ केली. तर आव्हाड यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. काही काळ या ठिकाणी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता काल नेमकं काय घडलं याची माहिती आव्हाड यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गोपीचंद पडळकर काल म्हणाले की, कोणी माझ्या गाडीसमोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार. हा सत्तेचा माज आहे. त्याच्या गाडीचा दरवाजा मला नाही संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याला लागला म्हणून मी बोललो. त्यानंतर गोपीचंद पडळकर हा विधिमंडळ परिसरात शिव्या द्यायला लागला. तुम्ही जर अशीच गाडी चालणार असाल तर आम्ही आता त्याला काय करणार, बंदुका घेऊन या... जीव घ्या आमचा. मी परवाच्या दिवशी फक्त मंगळसूत्र चोर म्हणून बोललो म्हणून एवढा राग आला. मी मंगळसूत्र चोर का बोललो?, असा टोलाही त्यांनी लगावला.
"मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. मला त्यादिवशी तो 'अर्बन नक्षल' आणि 'मुसलमानांचा एक्स', असं म्हणाला. मी पंधरा-वीस कार्यकर्त्यांसोबत फिरत नाही, मी एकटा फिरतो. घाला गाडी माझ्यावर,असंही आव्हाड म्हणाले.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांसह इतर विविध कारणांमुळे वादळी ठरत आहे. त्यात आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला. यावेळी गोपिचंड पडळकर यांनी जितेंद्र आव्हा यांना शिविगाळ केली. तर आव्हाड यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात काही काळ वातावरण तंग झाले.
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते. त्यात काही दिवसांपूर्वी गोपिचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबाबत केलेल्या टिप्पणीवरून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. तसेच विधान भवनात जात असणाऱ्या पडळकर यांना त्यांचं नाव न घेता घोषणाबाजी करत डिवचण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.