Maharashtra Politics : रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:26 IST2024-12-29T11:24:10+5:302024-12-29T11:26:36+5:30

Maharashtra Politics : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे काल एक कथित व्हॉट्स अप चॅट व्हायरल झाले आहे.

Maharashtra Politics Rupali Thombre's problems will increase, case registered against Jitendra Awhad in tweet case; What is the real case? | Maharashtra Politics : रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics : रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics ( Marathi News ) : बीडमध्ये काल शनिवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कथित व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल झाले आहेत. हे चॅट खोटे असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, आता या पोस्टवरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाकल केला आहे.  

Gautami Patil : "आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

काल आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एक व्हॉट्स अॅप चॅट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी पोस्ट केले. या ट्विटमध्ये  आव्हाड यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्स अॅपच्या चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. दरम्यान, आता यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल झालेल्या चॅटमध्ये काय आहे?

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एक कथित चॅट व्हायरल झाले आहे. या चॅटमध्ये, 'उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे. मुंडेंविरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय.

मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नको. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं. 

कसा मंत्री राहतो आणि अजित याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता. असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.

 

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन ठोंबरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझा खोटा व्हॉट्सॲप चॅटचा व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला? फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा व्हॉट्स अॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहाती मी  ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे' , हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आता हे चॅट फेक असल्याचं आव्हाड यांनी म्हटले आहे. आमदार आव्हाड यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Maharashtra Politics Rupali Thombre's problems will increase, case registered against Jitendra Awhad in tweet case; What is the real case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.