शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Politics : सरकारविरोधात लढण्याची जयंत पाटलांमध्ये धमक आहे का?; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 09:33 IST

Maharashtra Politics : आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुती सत्तेत आली. जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा विजय मिळवला. विजयानंतर काल आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडीत जाहीर सभा झाली, या सभेत पडळकर यांनी महाविकास आघाडी आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

शिंदे गटात अंतर्गत वाद? “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”दीपक केसरकरांचे मोठे विधान

महाविकास आघाडीमध्ये आता सरकार विरोधात लढण्याची हिंमत नाही, अशी टीका त्यांनी केली. आमदार पडळकर  म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना आमचे १०५ आमदार होते. एकही आमदार देवा भाऊ यांच्या पाठिमागून हटला नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता विचारावर काम करतो. तो संधी साधू असू शकत नाही, आता महाविकास आघाडीची सत्ता गेली. कोणाच्यात सरकार विरोधात लढण्याची हिंमत आहे का? जयंत पाटील यांच्यात लढण्याची हिंमत आहे का?, असा टोला पडळकर यांनी लगावला. 

पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांचे २०१९ भाषण पुन्हा ऐका. देवाभाऊ म्हणाले होते मी पुन्हा येईन. त्याच्यावर त्यांनी कसं भाषण केले होते. आता तुम्ही नागपुरातील भाषण ऐकले का? लढणे हे रक्तात असावे लागते. ही लोक लगेच वळचणीला पळतेत, लढू शकत नाहीत. त्यांच्यात हिंमत नाही. वळचणीला कोण जात असतं, वाघ कधी वळचणीला जात नाही. तो नेहमी रस्त्यावर समोर येत असतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.

"देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता आपल्याला काम करायचे आहे. आता मध्ये एकदा जयंत पाटील येणार अशी चर्चा होती. पाालकमंत्री होणार असं बोलत होते. ते आले तर येऊदे काय होतंय. ते याआधीही पालकमंत्री होते, तेव्हा ते आमच्या मित्रांना गोपीचंद पडळकर बैठकीला येणार आहेत का? असं विचारत होते, आता आपले पण दिवस येत आहेत. कशाला एवढा विचार करत आहात. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे, असंही पडळकर म्हणाले. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा