"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:09 IST2025-10-16T19:08:11+5:302025-10-16T19:09:21+5:30
Eknath Shinde: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला

"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर, विशेषतः शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. निवडणूक आयोग आणि ईव्हीएम प्रणालीवर सातत्याने होत असलेल्या आरोपांवर टीका करताना शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेला असे संबोधले.
शिंदे यांनी यावेळी आपला राजकीय दृष्टिकोन स्पष्ट करत तळागाळात जाऊन काम करण्यावर भर दिला. ते म्हणाले, "घरी बसलेल्या लोकांना जनता घरीच बसवते, काम करणाऱ्या लोकांना लोक मत देतात. तळागाळात जाऊन काम करणारे लोक जनतेचे मन जिंकतात. केवळ फेसबूक लाईव्ह चालत नाही. लोकांना थेट भेट हवी असते. अडीच वर्षे आपण जे काम केले, ते आपल्या समोर आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या कामाची तुलना करून दाखवली.
Ratnagiri, Maharashtra: Deputy CM Eknath Shinde says, "People who stay at home remain at home, but the public votes for those who work actively on the ground. Politics cannot be run through Facebook Live; the public wants direct interaction. Those who work at the grassroots level… pic.twitter.com/VXqvjKzSaz
— IANS (@ians_india) October 16, 2025
ईव्हीएम प्रणालीवर सातत्याने होणाऱ्या आरोपांवर म्हणाले...
विरोधकांकडून ईव्हीएम प्रणालीवर सातत्याने होणाऱ्या आरोपांवर शिंदे यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला. ते म्हणाले, "पराभवाच्या खात्रीने ते रोज निवडणूक आयोगाकडे जातायेत, काय काय आरोप करतायेत. जेव्हा तुम्ही लोकसभेला जिंकले, तेव्हा आरोप केला नाही. इतर राज्यात जिंकता तेव्हा आरोप करत नाही. हरले तेव्हा आरोप करतात. ईव्हीएमवर आरोप करतात, निवडणूक आयोगावर आरोप करतात, कोर्टाला सल्ला देतात
इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एका म्हणीचा वापर करून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय भेटीवर टोला लगावला. ते म्हणाले की, 'इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची' ही म्हण कोणाला लागू पडते, हे आपल्याला माहिती नाही, असे स्पष्ट केले असले तरी, त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता हे स्पष्ट होते.
आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत
शेवटी, शिंदे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे अनुयायी असल्याचे ठामपणे सांगितले. "बाळासाहेबाचा मावळा कधी रडताना पाहिला आहे का? रडीचा डाव खेळताना पाहिला आहे का? आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत," असे म्हणत त्यांनी आपल्या गटाची आक्रमक भूमिका स्पष्ट केली.