शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्र पोलिसांचा डंका; भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात देशात अव्वल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 9:28 PM

भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांना प्रथमच इतके घवघवीत यश मिळाले आहे़. 

ठळक मुद्दे १२ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी

पुणे : लखनौ येथे झालेल्या ६२ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस पथकाने १२ पदके मिळवत देशात अव्वल कामगिरी बजावून सर्वसाधारण विजेतेपद पदकाविले आहे़. ४० स्पर्धकांच्या या संघाने  ५ सुवर्ण, ३ रजत आणि ४ कांस्य पदके मिळविली आहे़. भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांना प्रथमच इतके घवघवीत यश मिळाले आहे.या स्पधेर्साठी देशभरातील ३० पोलीस दलातील १२५० स्पर्धकांनी भाग घेतला होता़. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याच्या धर्तीवर २००२ पासून राज्य पोलिस कर्तव्याचे आयोजन होते़. यामध्ये विज्ञान शास्त्राची तपासात मदत, घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, श्वान स्पर्धा या विभागामध्ये स्पर्धा घेतली जाते. यात निवड झालेल्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे काम रामटेकडी येथील राज्य गुप्तवार्ता प्रबोधनी येथे करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी संघाची निवड करण्यात आली होती. या संघात राज्य पोलिस दलाच्या विविध विभागातील कर्मचारी सहभागी होते. 

संघाने ही कामगिरी, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली टिम मॅनेजर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पल्लवी बर्गे, ज्योती क्षीरसागर, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी केली. स्पधेर्तील विजेते सायंटिफिक अडस टू इन्व्हेस्टिगेशन या प्रकारात क्रिमिनल लॉ, क्राईत इन्व्हेस्टिगेशन आणि

प्रोसिजर या प्रकारात अमोल पवार -सुवर्ण- सहायक निरीक्षक, लातूर, नितीन गिते - रजत, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर आणि राहुल खटावकर - कास्य, सहायक निरीक्षक, औरंगाबाद शहऱ

फॉरेन्सिक सायन्स : नितीन गिते -कास्य, राखी खवले, पोलीस हवालदार, सीआयडी, अतुल जाधव, पोलीस शिपाई, सातारा, कॉम्प्युटर अवेरनेस स्पधार् : १) विजय कुंभार -सुवर्ण, सहायक फौजदार, बिनतारी संदेश विभाग, पुणे, २) हनुमंत भोसले -रजत, पोलीस नाईक, सातारा़ पोलीस व्हिडिओग्राफी समीर बेंदगुडे - रजत,  पोलीस नाईक, राज्य राखीव पोलीस दल १ तसेच उपविजेतेपदाची ट्रॉफी, अंट्री सॅबोटेज चेक : रुम सर्चमध्ये अनिल साळुंखे, हवालदार, राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी व अमोल गवळी पोलीस शिपाई, सातारा यांना कास्य पदक मिळाले आहे़

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस