Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:22 IST2018-11-21T18:22:23+5:302018-11-21T18:22:46+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 नोव्हेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
शेतकऱ्यांंनी दाखविले शांततेचे आणि शिस्तीचे दर्शन, मुंबईच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार
कर्नाटकात ट्रक - कारचा अपघात; पुण्यातील सहा कामगार जागीच ठार
येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात,6 जणांचा मृत्यू
अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी
चंद्रशेखर बावनकुळेंनी घातली नागपूरनजिकच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड
शिवशाहीच्या अपघातात घट : एसटी महामंडळाचा दावा
राज्यात रब्बीवर अवकाळी पावसाचा सुखद शिडकावा; पिकांना संजीवनी
'त्या' मानाच्या वारकऱ्याने एकादशीलाच विठुरायाच्या पंढरीत घेतला अखेरचा श्वास
जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान
नागपुरात कार्यक्रमप्रसंगी झाला गोंधळ; महेंद्रसिंग धोनी निघून गेला