Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 19:16 IST2018-10-10T19:16:02+5:302018-10-10T19:16:45+5:30
राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर कधी बोललोच नाही; गडकरींचा यू-टर्न
'राज्य गहाण ठेवायची वेळ तुम्ही आणली, खापर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर का फोडता?'
उदयनराजे 'भाजपवापसी' करणार ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर 'चर्चा तर होणार'
पुढचा काळ दुष्काळाचा; सर्वांनी 'मिशन मोड'वर कामं करावी : मुख्यमंत्री
आरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका
सापांशी खेळण्याचा स्टंट जिवावर बेतला, सर्पदंशाने 'सर्पमित्राचा मृत्यू'
'बेस्ट' आठवणींचा रिव्हर्स गिअर पडणार, मुंबईची 'डेबल डेकर' इतिहासजमा होणार
#MeToo: नाना पाटेकर तनुश्री दत्ता वादावर सई ताम्हणकर म्हणते की...
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; लोकमतच्या दोन पत्रकारांचा गौरव
एका पायावर तो १० किलोमीटर धावला... पुण्यातल्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी नक्की वाचा
सवाई महोत्सवाने पेठांची सीमा ओलांडली : यंदा मुकुंदनगरमध्ये भरणार सुरांचा मेळा