सापांशी खेळण्याचा स्टंट जिवावर बेतला, सर्पदंशाने 'सर्पमित्राचा मृत्यू'

By अझहर शेख | Published: October 4, 2018 01:36 AM2018-10-04T01:36:16+5:302018-10-10T15:02:32+5:30

पंजाबमधील कथित सर्पमित्र (हॅण्डलर) विक्रम मल्होत याचा सर्पदंश होऊन ऐन वन्यजीव सप्ताहात मृत्यू झाला. विक्रम हा नाशिकमध्ये सामनगाव शिवारात

Snake stunt sticks to life, snake bites 'death of Sarpitarra' | सापांशी खेळण्याचा स्टंट जिवावर बेतला, सर्पदंशाने 'सर्पमित्राचा मृत्यू'

सापांशी खेळण्याचा स्टंट जिवावर बेतला, सर्पदंशाने 'सर्पमित्राचा मृत्यू'

नाशिक : पंजाबमधील कथित सर्पमित्र (हॅण्डलर)विक्रम मल्होत याचा सर्पदंश होऊन ऐन वन्यजीव सप्ताहात मृत्यू झाला. विक्रम हा नाशिकमध्ये सामनगाव शिवारात अतिविषारी व दुर्मीळ प्रजातीच्या सापासोबत स्टंट करत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.  याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, विक्रम मल्होत, त्याच्या दोन भवांसोबत नाशिकमध्ये आला होता. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिकरोड परिसरात समनगाव शिवारात एका विषारी सापाने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्री साडे 11 वाजेच्या सुमारास त्याच्या भावांनी त्याला अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

विक्रम हा यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय व लोकप्रिय होता. तो विविध प्रजातीच्या सर्पांसोबत छायाचित्रे, व्हिडीओ सातत्याने अपलोड करत असल्याने खूप नेटिझन्स त्याला फॉलो करत होते. अशास्त्रीय पद्धतीने धोकादायक रित्या तो सर्प हाताळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतो. विक्रम नाशिकमध्ये का आला? केव्हा आला? त्याच्यासोबत कोणते साप त्याने आणले होते का?? स्थानिक कोणत्या कथित सर्पमित्रांसोबत तो वावरला?? सर्प तस्करीचा त्यांचा काही हेतू होता का?? कोणत्या जातीच्या विषारी सापाने त्याला चावा घेतला? असे विविध प्रश्न अनुत्तरित आहे. त्याच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने कथित सर्पमित्रांमध्ये खळबळ उडाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दुर्मिळ अशा मगरीची आठ पिल्ले, दोन कासव सोबत तस्करी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी मांडूळ तस्करीचे रॅकेट ही मागील महिन्यात पोलिसांनी उध्वस्त केले होते. एकूण नाशिक या दोन महिन्यांत वन्यजीवांच्या तस्करीबाबत अत्यंत संवेदनशील बनले आहे. यामुळे नाशिक वनविभाग व पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कथित सर्पमित्र विक्रमचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूने पुन्हा नाशिक चर्चेत आले आहे. विक्रमचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सकाळी पंचनामा शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सोपविला जाणार आहे. या घटनेनंतर वनविभागाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Snake stunt sticks to life, snake bites 'death of Sarpitarra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.