शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणार?; शिवसेना म्हणे, अद्याप निर्णय झालेला नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 21:32 IST

मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्दे राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घोषणा केली होती.मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याचं न्यूज 18 लोकमतनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

मुंबई - राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घोषणा केली होती. परंतु असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलेलं आहे. मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याचं न्यूज 18 लोकमतनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर देखील मागच्या भाजपा सरकारने यासाठीचा अध्यादेश काढला नव्हता. दरम्यान मुस्लिमांना नोकरीतही आरक्षण देण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून, लवकरच त्यावर निर्णय होईल, असंही मलिक यांनी सांगितले. परंतु शिवसेनेच्या सावध पवित्र्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी आघाडी सरकारने 2014मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र ते आरक्षण नवीन सरकारच्या काळात कायम राहिले नाही. तसेच ते न्यायालयातही टिकले नाही. आज प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येईल. मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षण लागू व्हावे, यासाठी लवकरात लवकर कायदा तयार करून आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे मलिक यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMuslimमुस्लीम