Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:26 IST2025-12-15T16:19:21+5:302025-12-15T16:26:37+5:30
Maharashtra Municipal Elections 2025 Dates Announced: सर्व २९ महापालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू

Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Maharashtra Municipal Elections 2025 Dates Announced: राज्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या सर्व महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. नामनिर्देशन पत्र ऑफलाईन घेण्यात येईल. राजकीय पक्षांच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या २-३ वर्षापासून या महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र अखेर आज निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांबद्दल आज कार्यक्रम जाहीर झाला. राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार, अशी माहिची सूत्रांकडून आधीच मिळाली होती. ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही असेही सांगण्यात आले होते.
'असा' असेल निवडणुकीचा कार्यक्रम
- अर्ज दाखल करण्याची मुदत- २३ ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जाची छाननी- ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी माघारीची मुदत- २ जानेवारी २०२६
- निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी- ३ जानेवारी २०२६
- मतदान दिनांक- १५ जानेवारी २०२६
- मतमोजणी- १६ जानेवारी २०२६
दरम्यान, नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की, जिथे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे येथे आधी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल, असा तर्क आहे. मात्र, आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
कोणकोणत्या २९ महापालिकांच्या निवडणुका होणार?
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- पुणे महानगरपालिका
- नागपूर महानगरपालिका
- सोलापूर महानगरपालिका
- कोल्हापूर महानगरपालिका
- ठाणे महानगरपालिका
- पिंपरी-चिंचवड महापालिका
- नाशिक महानगरपालिका
- औरंगाबाद महानगरपालिका
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
- अमरावती महानगरपालिका
- नवी मुंबई महानगरपालिका
- नांदेड – वाघाळा महानगरपालिका
- उल्हास नगर महानगरपालिका
- सांगली-मिरज-कुपवाडा महापालिका
- मालेगाव महानगरपालिका
- भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
- अकोला महानगरपालिका
- भाईंदर महानगरपालिका
- अहमदनगर महानगरपालिका
- धुळे महानगरपालिका
- जळगाव महानगरपालिका
- वसई-विरार महानगरपालिका
- परभणी महानगरपालिका
- चंद्रपूर महानगरपालिका
- लातूर महानगरपालिका
- पनवेल महानगरपालिका
- इचलकरंजी महानगरपालिका
- जालना महानगरपालिका