शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad : "पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा...", जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 10:35 IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. तसेच, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. 

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर बुधवारी मोर्चा येणार असल्याचे स्वतः ट्विटद्वारे सांगितले आहे. मोर्चा पुण्यावरून येत असल्याचा उल्लेख करत पोलिसांना वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. तसेच, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या त्यांच्या घरासमोर जमा झाल्या. त्यांनी आव्हाडांच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना बाहेरच अडवून घरापासून दूर नेले तर आव्हाडांच्या घरी आधीच 60-70 कार्यकर्ते, नगरसेवक, शहर अध्यक्ष उभे आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी रात्री उशिरा ट्विटद्वारे म्हटले आहे की, "उद्या (बुधवारी) माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा....... जय भीम!"

दरम्यान, ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने नुकतेच ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

(जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. फोटो- विशाल हळदे)

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?"खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचे होते, तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचे नव्हते. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येत देत नसते. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसते घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत", असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे