maharashtra minister chhagan bhujbal tasted corona positive | Chhagan Bhujbal Corona Positive: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देछगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची दिली माहितीयापूर्वी राजेश टोपे आणि जयंत पाटील यांना झाली होती कोरोनाची लागण

नाशिक : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे आज ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचण्या करून घ्यावा असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री भुजबळ गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली होती. तसंच रविवारी देवळाली येथील आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह हजेरी लावली होती. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या बैठकीला देखील ते हजर होते. नाशिकमध्ये येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावादेखील त्यांनी घेतला होता. तसेच त्याची माहिती माध्यमांना दिली. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिक ठाले पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. इतकेच नव्हे तर सायंकाळी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नाशिकमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी हे जाहीर केली. यामुळे गेल्या दोन दिवसात भुजबळ हे अनेक मान्यवरांच्या आणि नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे संबंधितांनादेखील आता चाचणी करून घ्यावी लागणार आहे. यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण

यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. आपली प्रकृती उत्तम असून डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली होती.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra minister chhagan bhujbal tasted corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.