शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:08 IST

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध, महाराष्ट्रातील राजकारण, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि आयपीएलचा 'रनसंग्राम' यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स.. ...

03 Apr, 26 01:45 PM

बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी

बिहारमध्ये दारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेली आहे. दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 01:29 PM

सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

03 Apr, 26 01:23 PM

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडमुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघत आहे. यातच नुकत्याच समोर आलेल्या 'VoteVibe' च्या ताज्या ओपिनियन पोलने राज्याच्या राजकारणात संमिश्र चित्र निर्माण केले आहे. या सर्वेक्षणात, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत असला तरी, त्यांना जागांचा मोठा फटका बसत असल्याचेही दिसत आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. या नव्या सर्वेक्षणानुसार, २९४ सदस्यीय विधानसभेत टीएमसीला १७४ ते १८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपला यावेळेस १०८ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  १४८ हा बहुमताचा आकडा आहे. सविस्तर वाचा

03 Apr, 26 01:21 PM

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडमुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघत आहे. यातच नुकत्याच समोर आलेल्या 'VoteVibe' च्या ताज्या ओपिनियन पोलने राज्याच्या राजकारणात संमिश्र चित्र निर्माण केले आहे. या सर्वेक्षणात, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत असला तरी, त्यांना जागांचा मोठा फटका बसत असल्याचेही दिसत आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. या नव्या सर्वेक्षणानुसार, २९४ सदस्यीय विधानसभेत टीएमसीला १७४ ते १८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपला यावेळेस १०८ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  १४८ हा बहुमताचा आकडा आहे.

03 Apr, 26 12:32 PM

१९० कोटींचा विमा घोटाळा उघड

 माउंट एव्हरेस्टच्या गाईड्सवर असा गंभीर आरोप आहे की, ते पर्यटकांच्या अन्नात गुपचूप काही पदार्थ मिसळून त्यांना आजारी पाडत होते, जेणेकरून हेलिकॉप्टरने रेस्क्यू करता येईल. हा तब्बल २ कोटी डॉलर्सचा इन्शुरन्स क्लेम' म्हणजेच विमा घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. नेपाळ पोलिसांनी या कटात सामील असलेल्या ३२ जणांवर संघटित गुन्हेगारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. वाचा सविस्तर

03 Apr, 26 12:27 PM

खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी

भोंदू अशोक खरात पीडिताला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून लाखो रुपये स्वीकारत असे. एवढेच नव्हे तर त्याने मिरगाव येथील १५ ते २० लाखांची जमीन अशाच प्रकारे कवडीमोल भावात नावावर करून घेतल्याची चर्चा आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 12:19 PM

"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले"; ६० देशांच्या बैठकीत भारतानं मांडली स्पष्ट भूमिका

अमेरिका-इस्रायल यांच्या सोबतच्या युद्धात इराणने 'होर्मुझच्या समुद्रधुनी'चा शस्त्राप्रमाणे वापर करायला सुरुवात केल्याने जवळपास संपूर्ण जगावरच तेलाचे भीषण संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, इराणने बंद केलेली ‘होर्मुझची समुद्रधुनी’ पुन्हा सुरू करण्यासाठी ब्रिटनच्या पुढाकाराने ६० हून अधिक देशांची एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताची भूमिका अत्यंत ठामपणे मांडली.

परराष्ट्र सचिव म्हणाले, "या संकटाचा भारतावर थेट परिणाम झाला आहे. आखाती प्रदेशात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे, सर्व संबंधित पक्षांमध्ये संवाद आणि कुटनीतिक संबंध पुन्हा सुरू करून तणाव कमी करणे." एवढेच नाही तर, "होर्मुझ नाकेबंदीमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे," असा इशाराही विक्रम मिस्री यांनी यावेली दिला.

03 Apr, 26 12:09 PM

पाकिस्तानात पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, होतेय भारताशी तुलना

सध्या पाकिस्तान अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थीचा आव आणताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात या युद्धामुळे त्याचेच पुरते कंबरडे मोडले आहे. येथे तेलाचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे की, शहबाज शरीफ सरकारने रात्रीतूनच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३७, तर डिझेलच्या दरात १८४ रुपयांची प्रचंड वाढ केली आहे. या क्रूर दरवाढीनंतर आता पाकिस्तानात पेट्रोल ४५८ तर डिझेल ५२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. वाचा सविस्तर

03 Apr, 26 12:13 PM

आता इंधन आणि खतांचंही टेन्शन संपणार! रशिया धावला भारताच्या मदतीला

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाने संपूर्ण जग इंधन टंचाइचा सामना करताना दिसत आहे. यातच आता, भारताचा जुना मित्र असलेला रशिया मदतीसाठी सरसावला आहे. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांनी गुरुवारी भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली. सविस्तर वाचा

03 Apr, 26 12:12 PM

पोटनिवडणूक २०२६: बारामती, राहुरीत निवडणूक बिनविरोध नाहीच, काँग्रेस उतरणार मैदानात

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून, दोन्ही मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होण्याची चर्चा सुरूवातीला सुरू होती. पण, आता काँग्रेसने दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. 

पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने होकार दिला असून, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबद्दल माहिती दिली आहे. 

राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणारे अर्ज पक्षाकडे आले आहेत. बारामतीतून ६ अर्ज, तर राहुरी मतदारसंघातून चार जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून, पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेसने निवडणुकीत उडी घेतल्यास बिनविरोधची शक्यता मावळणार आहे. 

03 Apr, 26 11:59 AM

अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले

इराणमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन हवाई दलाचे एफ-३५ हे लढाऊ विमान इराणच्या लष्कराने पाडले आहे. मध्य इराणच्या हवाई हद्दीत असताना ही कारवाई करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. १५ दिवसात अमेरिकेने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान गमावले आहे. दरम्यान, यावर अमेरिकन लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

03 Apr, 26 11:59 AM

एकनाथ शिंदेंनी घेतले तिरुपतीचे दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुमला येथे तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेंही होते.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAshok Kharatअशोक खरातDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईPrice Hikeदर वाढNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस