Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:13 IST2026-04-10T10:04:45+5:302026-04-10T12:13:26+5:30

Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 10 April 2026: अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामानंतरही अटी-शर्तींवरून सुरू असलेलं वाक्-युद्ध, इस्रायल आणि ...

Maharashtra Marathi News Live Updates 10 April 2026: US-Iran Ceasefire, Strait of Hormuz tension, Israel Iran conflict, Donald Trump, Pakistan's role in Ceasefire, Impact on India, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, Elections, Ashok Kharat Crime, IPL | Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 10 April 2026: अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामानंतरही अटी-शर्तींवरून सुरू असलेलं वाक्-युद्ध, इस्रायल आणि इराणने एकमेकांना दिलेले इशारे, या सगळ्या परिस्थितीचा जागतिक स्तरावर होणारा परिणाम, भारताच्या अर्थकारणावरील परिणाम, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, भोंदू अशोक खरात प्रकरण, आयपीएलचा थरार, या आणि अशा देश-विदेशातील ठळक बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स... 

LIVE

Get Latest Updates

10 Apr, 26 : 11:37 AM

ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

10 Apr, 26 : 11:26 AM

सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड

आंध्र प्रदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. एसीबीने ७ एप्रिल रोजी विजयावाडा आणि विशाखापट्टणम येथे एकाच वेळी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा पर्दाफाश केला. वाचा सविस्तर 

10 Apr, 26 : 10:23 AM

एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या - ओमराजे निंबाळकर

"मी दोन टर्मचा खासदार आहे. दोन्ही वेळेस हीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे मी चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याची मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या," असं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलं.

10 Apr, 26 : 10:21 AM

बदनामी करु नका, खटला दाखल करु; अरविंद सावंत यांचा इशारा

एकनाथ शिंदेंसोबत बैठक केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला. 'काही झालं तरी मी शिंदेसोबत जाणार नाही. अशा प्रकारे आमचे फोटो छापून ही चुकीची बातमी दिली. मी बदनामीचा खटला दाखल करेन,' असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला.

10 Apr, 26 : 10:16 AM

"उद्या त्यामध्ये माझंही नाव टाकतील"; शिंदेंसोबत खासदारांच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रात राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी ही बातमी पूर्णपणे निराधार असून या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं. त्या खासदारांच्या यादीत उद्या माझंही नाव टाकतील, असंही संजय राऊत म्हणाले.
 

10 Apr, 26 : 10:12 AM

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंच्या खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक झाल्याची चर्चा

राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरेंच्या आठ खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यात बुधवारी रात्री गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र ठाकरेंच्या खासदारांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
 

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 10 April 2026: US-Iran Ceasefire, Strait of Hormuz tension, Israel Iran conflict, Donald Trump, Pakistan's role in Ceasefire, Impact on India, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, Elections, Ashok Kharat Crime, IPL