शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:07 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024 : उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपची जोरदार हवा असल्याचे चित्र होते, दक्षिणेत भाजपचे कमळ काही ठिकाणी फुलेल पण मोठा फायदा भाजपविरोधी पक्षांनाच होईल, असे म्हटले जात होते.

मुंबई : कमळावर लढणारा भाजप, धनुष्य हातात घेतलेली शिंदे सेना आणि चार जागांवर घड्याळावर टिकटिक करत सोबत असलेला अजित पवार गट अशी महायुती एकीकडे आणि दुसरीकडे पंजा दाखवत असलेली १३९ वर्षांची काँग्रेस आणि फाटाफुटीचे धक्के बसलेली उद्धव सेना (मशाल) आणि शरद पवार गट (तुतारी) यांची महाविकास आघाडी यांच्यातील निवडणूक युद्धाचा फैसला मंगळवारी होईल.

मोदी फॅक्टर, राज्यातील सत्ताप्रयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रचाराच्या धुराळ्यात झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, संविधान बदलाची चर्चा, मुस्लिम आरक्षण या विषयांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीने रण पेटविले, मतदारांना त्यातून काय भावले, काय पसंत नाही पडले याचा निकालही मंगळवारी येणार आहेच. सत्ताधारी महायुतीसाठी तसेच महायुतीला धक्के देण्यासाठी सज्ज असलेल्या मविआसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. 

उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपची जोरदार हवा असल्याचे चित्र होते, दक्षिणेत भाजपचे कमळ काही ठिकाणी फुलेल पण मोठा फायदा भाजपविरोधी पक्षांनाच होईल, असे म्हटले जात होते. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या रणांगणात उतरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी वातावरण ढवळून काढले. मविआसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. कोणाच्या झंझावाताला यशाची फळे येतात याचा फैसला काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. 

मतदारांची साथ कुणाला?मराठा आंदोलनाच्या निमित्ताने उद्भवलेली जातीय समीकरणे, मुस्लिम आणि दलित मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याची सर्वत्र असलेली चर्चा, पहिल्या-दुसऱ्या टप्प्यानंतर धार्मिक वळणावर गेलेली निवडणूक या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणाला साथ दिली हे मंगळवारी सकाळपासून कळू लागेल आणि दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल. 

वंंचितला कितपत यश मिळणार?ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला यावेळी काही यश मिळेल का? या पक्षामुळे मतविभाजन होऊन अन्य कोणाला त्याचा फायदा होईल का? हेही निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर (अकोला), राजू शेट्टी (हातकणंगले), विशाल पाटील (सांगली), राजेश पाटील (पालघर), नीलेश सांबरे (भिवंडी) या लहान पक्षांच्या वा अपक्ष उमेदवारांना मतदारांनी कितपत संधी दिली हेही निकालातून समोर येणार आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी