शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 07:34 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली. 

 मुंबई - लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे सचिव राहिलेले मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना उस्मानाबादमध्ये भाजपकडून उमेदवारी दिली जाणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आता तेथे अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत. 

माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते धुळे मतदारसंघात लढण्यास इच्छुक होते आणि तशी मागणीही त्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, तेथे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाच पक्षाने पुन्हा संधी दिल्याने दिघावकर यांचे स्वप्न भंगले. समृद्धी महामार्गाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महायुतीतर्फे लढविले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. 

माजी आयपीएस रहेमान धुळ्यात अब्दुर रहेमान हे वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. २००२ ते २००४ या काळात ते धुळ्याचे पोलिस अधीक्षक होते. १९९७ च्या बॅचचे असलेले रहेमान यांनी २०१९ मध्ये सीएएच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता. तेव्हा ते अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी होते. ते मूळ बिहारचे रहिवासी आहेत. आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर ते आयपीएस झाले.

किशोर गजभिये रिंगणातनिवृत्त आयएएस अधिकारी किशोर गजभिये हे रामटेक मतदारसंघात अपक्ष लढत आहेत. २०१९ मध्ये ते याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी त्यांचा १,२६,७८३ मतांनी पराभव केला होता. गजभिये हे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी होते. २०१४ मध्ये त्यांनी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढविली होती, पण ते पराभूत झाले होते.

श्रीनिवास पाटील स्वेच्छेने रिंगणातून बाहेर- साताराचे विद्यमान खासदार आणि माजी आयएएस अधिकारी श्रीनिवास पाटील यावेळी रिंगणात नसतील. प्रकृतीच्या कारणाने आपण लढू इच्छित नाही, असे त्यांनी शरद पवार गटाला कळविले आहे. पाटील यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. - गडचिरोलीतील काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान हे उत्पादन शुल्क खात्यात अधिकारी होते, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४