शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

भाजपचा दबाव, शिंदेंची कोंडी, महायुतीचे जागावाटप अधांतरी; तोडगा निघण्याऐवजी गुंता वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 07:00 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपात भाजप दबाव वाढवत असल्याचा सूर शिंदेसेनेकडून लावला जात असून आपल्या खासदारांचे आणि निकटस्थांचे मतदारसंघ खेचून आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

मुंबई - महायुतीच्या जागावाटपात भाजप दबाव वाढवत असल्याचा सूर शिंदेसेनेकडून लावला जात असून आपल्या खासदारांचे आणि निकटस्थांचे मतदारसंघ खेचून आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. तोडगा निघण्याऐवजी चित्र अधिक क्लिष्ट बनले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपच लढणार असे परस्पर जाहीर करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धक्का दिला. सर्वेक्षणाचे कारण देत भाजप उमेदवार बदलण्यासाठी आमच्यावर दबाव आणत आहे, महायुतीसाठी हे घातक असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून आली आहे.

वेगवेगळी सर्वेक्षणे, स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांचा फीडबॅक या आधारे शिंदेंनी त्यांचे काही उमेदवार बदलले पाहिजेत असे भाजपने सुचविल्याची माहिती आहे. त्यात भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), धैर्यशील माने (हातकणंगले) व हेमंत पाटील (हिंगोली) या तीन जागांचा समावेश आहे. 

भाजपने असा दबाव आणणे योग्य नाही. भाजपला नकोत म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे उमेदवार का बदलावेत? भाजपच्या षड्यंत्राला शिंदे बळी पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री व शिंदे गटात असलेले सुरेश नवले यांनी दिली.

ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि मुंबई उत्तर पश्चिम हे मतदारसंघ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर शिंदेसेनेने एकही मतदारसंघावरील दावा अद्याप तरी सोडलेला नाही.

भुजबळांना ‘वरून’ शब्द; स्थानिक नेत्यांची पंचाईतछगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची ‘कमिटमेंट’ वरिष्ठ पातळीवरून म्हणजे दिल्लीतून झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांची पंचाईत झाली आहे. वर्धेत रामदास तडस (तेली) यांना आधीच उमेदवारी दिली आहे. आता नाशिकमध्ये भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास माळी समाजात आणि ओबीसींमध्ये सकारात्मक मेसेज जाईल, असे भाजपश्रेष्ठींचे मत असल्याचे सांगितले जाते. नाशिक मतदारसंघ भुजबळांसाठी अनुकूल नसेल असे राज्यातील नेत्यांचे म्हणणे असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंसाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे या जागेबाबतही निर्णय होऊ शकलेला नाही.

सातारा भाजपकडे जाण्याची शक्यतासूत्रांनी सांगितले, की महायुतीत सातारा येथील जागा भाजपकडे जाईल असे जवळपास ठरले आहे. तेथे अजित पवार गटाने आग्रह धरला असला तरी ही जागा आम्हालाच हवी असे भाजपकडून त्यांना स्पष्टपणे कळविण्यात आले आहे. साताऱ्याच्या बदल्यात नाशिक राष्ट्रवादीकडे जाईल, असे दिसते.

शिंदेंचा बालेकिल्ला ठाणेही भाजपकडे?ठाणे भाजपकडे जाईल असे चित्र आहे. संजीव नाईक तेथे भाजपचे उमेदवार असू शकतात. ठाण्याचा आग्रह शिंदेसेनेने सोडलेला नाही. त्यामुळे तिढा कायम आहे. ठाण्यात भाजपचा आमदार आहे, नवी मुंबईत व मिरा-भाईंदरमध्येही आमचे प्राबल्य आहे या आधारावर आम्ही दावा केला असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.'

भाजप खासदार उद्धवसेनेच्या वाटेवरमुंबई : जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यापाठोपाठ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यानंतर तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले उन्मेष पाटील बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. ठाकरेंकडून त्यांना जळगावची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही मैत्रीपूर्ण भेट होती. उद्या (बुधवारी) सकाळी मी तुमच्याशी सविस्तर बोलेन, असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४