शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलोय - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 9:27 PM

Maharashtra Lockdown: पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा एकप्रकारे इशारा दिला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन करायंच की नाही, तर परदेशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये बिकट अवस्था, फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन आहे.

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही. परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलो आहे. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा एकप्रकारे इशारा दिला आहे.

लॉकडाऊन करायंच की नाही, तर परदेशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये बिकट अवस्था, फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन आहे. केनिया, यूकेसारख्या अनेक देशात कडक लॉकडाऊन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, अनेक देशांमधील परिस्थिती नाजूक आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू, या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम म्हणजेच वर्क फॉर्म होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी फ्रान्समधील परिस्थिती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

(राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती)

हंगेरीमध्येही वर्क फ्रॉम होम, डेनमार्कमध्येही तीच परिस्थिती, ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेल्जियमने एक महिना परत लॉकडाऊन लागू केलाय. पोर्तूगाल सरकारने शहराशहरामधील नागरिकांची ये-जा थांबवली आहेत. आयर्लंडमध्ये डिसेंबर पासून कडक निर्बंध आहे. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहे. यूकेतही अडीच-तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शिथिलता दिली जाते. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण एका कात्रीत आपण सापडलो आहे. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालू ठेवले तर अनर्थ घडतोय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे :-- पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही - राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार - लॉकडाऊन करणार का? याचं उत्तर मी अजून देणार नाही- रस्त्यांवर उतरा, पण नागरिकांच्या मदतीसाठी, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला- लॉकडाऊनबाबत सल्ला देणाऱ्या उद्योगपतीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला- विरोधी पक्षाच्या लॉकडाऊनबाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांची टीका- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सात कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय- कोरोना काळात राजकारण नको.- सर्वपक्षांनी राज्य सरकारला सहकार्य करावं- रुग्ण वाढ थांबवण्यासाठी सध्या कुठलाही उपाय नाही- लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम- कोरोनाची लस घेतली तरी मास्क अनिवार्य. - अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळाख्यात- मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणार- सध्या मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडे आठ हजारांवर पोहोचली आहे.- राज्यात एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे