ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:11 IST2025-11-15T07:10:51+5:302025-11-15T07:11:02+5:30
Maharashtra Local Body Election: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
त्याचबरोबर सुटीच्या दिवशी शनिवारी (दि. १५) आणि रविवारी (दि. १६) रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विविध राजकीय पक्षांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ही सवलत देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. १७ नोव्हेंबरला दुपारी ३ पर्यंत अर्ज भरता येतील.