शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:35 IST

Maharashtra Hone trap Scandal:

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला.

या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात  आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधे निवेदन द्यायला तयार नाही, हे धक्कादायक असल्याचे पटोले म्हणाले. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता चिंताजनक आहे. या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव या सगळ्यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असेही पटोले म्हणाले.

हनी ट्रॅपची खरोखरच चौकशी सुरु आहे का? : दानवे

हनी ट्रॅपमुळे सरकारच्या कामकाजातील गुप्तता, महत्वाच्या फाईल्स बाहेर गेल्याची चर्चा आहे. राज्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे योग्य नाही. यातून मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मेलींगचे प्रकार होत आहेत. त्यामुळे हनी ट्रॅपची खरोखरच चौकशी सुरु आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला केला.

हनी ट्रॅप प्रकरणावर चर्चा करण्यासाठी दानवे यांनी नियम २९१ अन्वये सभागृहात प्रस्ताव मांडला. परंतु, तो सभापतींनी नाकारला. परंतु, हा २९१ कसा होतो हे सांगताना दानवे म्हणाले. राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यावेळी असे ट्रॅपिंग  करणारे लोक केंद्र सरकारने पकडले होते. अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाइल बाहेर गेल्याची माहिती आहे.

शासकीय कामकाजात याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. राज्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असल्याने सभापतींनी दालनात हा विषय मंजूर केला नसला तरी सरकारने यावर भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रhoneytrapहनीट्रॅप