त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:22 AM2019-12-19T05:22:59+5:302019-12-19T05:23:26+5:30

हिवाळी अधिवेशन : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत बोचरी टीका

maharashtra has the governments that constantly question each other: Devendra Fadanvis | त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रचंड परस्पर विसंगती असलेले हे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये ‘त्रिशंकू’चा नवा अर्थ कळला. त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.


‘मी पुन्हा येईन’ असे म्हणालो होतो आणि युतीला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. आमच्यासोबत मते मागणारे निघून गेले, चूक त्यांची होती असे सांगत फडणवीस यांनी,
कुछ पन्ने क्या फटे
जिंदगी की किताब के
जमाने ने समझा
दौर हमारा खतम हो गया।


असा शेर सुनावला. हे सरकार हे राजकीय स्वार्थापोटी बनलेले असून, त्यास जनादेश मिळालेला नाही. राजकीय हाराकिरीने आलेले सरकार आहे. जनतेच्या मनातील सरकार नाही. बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीने करण्याचा दिला होता काय? शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्त्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करू नये, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला. ते म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे. सरकार टिकेल की नाही, या भीतीने तर विस्तार टळत नाही ना? नागरिकत्व कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सावरकरांची अखंड हिंदुस्तानची भूमिका यांना (काँग्रेस) मान्य आहे का?


पाच वर्षांत दिले ११ हजार कोटी रुपये
डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे २६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ३,७८९ कोटी रुपये मिळाले होते. आमच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि ११ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: maharashtra has the governments that constantly question each other: Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.