शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 14:33 IST

शिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती.

ठळक मुद्देआता राज्य सरकारकारने कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी करायला सुरुवात केली आहे. अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीच्या आधारे हा तपास करण्यात येणार आहेशिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे.

मुंबई - ठाकरे सरकारशी पंगा घेणाऱ्या कंगना रणौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता राज्य सरकारकारने कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी करायला सुरुवात केली आहे. गृह मंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीच्या आधारे हा तपास करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. यानंतर सरकारणे चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील

एनसीबीने ड्रग्सप्रकरणी कंगनाची चौकशी करावी -महाराष्ट्र काँग्रेसने सोमवारीच कंगना रनौतशी संबंधित ड्रग लिंक्सची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने स्वतःच ड्रग घेत असल्याची कबुली एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती, अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्ससंदर्भात चौकशी केली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले होते.

कंगना-राऊत शाब्दिक वाद - सध्या कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यावर संजय राऊत यांनी तिला मुंबईत न येणाचा सल्ला दिला होता. यानंतर कंगनानेही मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कुणात हिंमत असेल तर त्याने अडवून दाखवावे, असे म्हटले होते. कालच केंद्र सरकारने कंगनाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे.

कंगना-राऊत सूर नरमलेशिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील शब्दिक युद्धाने सोमवारी काहीसा नरमाईचा व खुलासेवजा सूर आळवला. एकीकडे कंगनाने 'मला महाराष्ट्र आवडतो' असे ट्विट करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, आम्हाला शिवसेना प्रमुखांनी महिलांच्या सन्मानाची शिकवण दिल्याचे ट्विट राऊत यांनी केले. राऊत विरूद्ध राणौत वाद सध्या गाजत आहे.

कंगना सध्या हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी आहे. मुंबईत ती खारमध्ये राहते. तर वांद्रे येथील पाली हिलमध्ये तिचे मनिकर्णिका फिल्म नावाने कार्यालय आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMaharashtraमहाराष्ट्रAnil Deshmukhअनिल देशमुखState Governmentराज्य सरकार