राज्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, अजितदादांकडे पुण्यासह बीडची जबाबदारी, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 23:06 IST2025-01-18T20:47:35+5:302025-01-18T23:06:26+5:30

Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.

Maharashtra Government: The list of guardian ministers in the state has finally been announced, Ajit Pawar has the responsibility of Pune and Beed, while... | राज्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, अजितदादांकडे पुण्यासह बीडची जबाबदारी, तर...

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, अजितदादांकडे पुण्यासह बीडची जबाबदारी, तर...

Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 

या प्रमुख नेत्यांबरोबरच नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रिपद, वाशिमचं पालकमंत्रिपद हसन मुश्रिफ यांच्याकडे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. सांगलीचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरचं पालकमंत्रिपद गणेश नाईक यांच्याकडे आणि जळगावचं पालकमंत्रिपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) - गडचिरोली
- एकनाथ शिंदे - (उपमुख्यमंत्री) - ठाणे, मुंबई शहर
- अजित पवार - (उपमुख्यमंत्री) - पुणे, बीड
- चंद्रशेखर बावनकुळे  - नागपूर, अमरावती
- राधाकृष्ण विखे पाटील - अहिल्यानगर
- हसन मुश्रिफ - वाशिम
- चंद्रकांत पाटील - सांगली
- गिरीश महाजन - नाशिक
- गणेश नाईक - पालघर
- गुलाबराव पाटील - जळगाव
-  संजय राठोड - यवतमाळ
- आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) - मुंबई उपनगर
 - उदय सामंत - रत्नागिरी
- जयकुमार रावल - धुळे
- पंकजा मुंडे - जालना
- अतुल सावे - नांदेड  
- अशोक उईके - चंद्रपूर
- शंभुराज देसाई - सातारा
- अदिती तटकरे - रायगड
- शिवेंद्रराजे भोसले - लातूर
- माणिकराव कोकाटे - नंदूरबार
-  जयकुमार गोरे - सोलापूर
- नरहरी झिरवळ - हिंगोली
- संजय सावकारे - भंडारा
- संजय शिरसाट - छत्रपती संभाजीनगर
- प्रताप सरनाईक - धाराशिव
- मकरंद जाधव - बुलढाणा
- नितेश राणे - सिंधुदुर्ग
- आकाश फुंडकर - अकोला
- बाबासाहेब पाटील - गोंदिया
- प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) - कोल्हापूर
- आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) - गडचिरोली
- पंकज भोयर - वर्धा
- मेघना बोर्डीकर - परभणी

Web Title: Maharashtra Government: The list of guardian ministers in the state has finally been announced, Ajit Pawar has the responsibility of Pune and Beed, while...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.