शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Maharashtra Government : साहेब... तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; शिवसेनेच्या आमदारांचे उद्धव ठाकरेंना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:27 AM

‘मातोश्री’वर शिवसेनेच्या आमदारांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात तब्बल २० वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळत असताना मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच हवे आहाते, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली.मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आमदारांनी एकमुखाने मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव यांना गळ घातली. ही केवळ आमची इच्छा नाही तर राज्यातील तमाम शिवसैनिकांचीही तीच इच्छा आहे. त्या इच्छेचा आदर करून आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारा, असे साकडे या आमदारांनी उद्धव यांना घातले. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असेल या बाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच माजी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि खा.संजय राऊत यांची नावे त्या संदर्भात घेतली जात आहेत.मुख्यमंत्रीपदासाठी सुरुवातीला उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची नावे होती. मात्र, उद्धव यांचे नाव असल्याने आदित्य यांचे नाव मागे पडले. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद सांभाळायचे तर आदित्य ते तूर्त पेलू शकणार नाहीत, यावर पक्षात एकमत होते. गेले काही दिवस आमदारांची मोट बांधणारे एकनाथ शिंदे, तीन पक्षांचे सरकार येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते म्हणून सुभाष देसाई यांची नावेही चर्चेत आहेत. उद्धव हे मुख्यमंत्री होणार नसतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पसंती त्यांचे खास मानले जाणारे संजय राऊत यांच्या नावाला असेल.सरकार तीन पक्षांचे असले तरी मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असल्याने सरकारचे नेतृत्व एका अर्थाने शिवसेनेकडे असेल. अशावेळी सरकारवर नियंत्रण ठेवायचे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये एकवाक्यता ठेवायची तर उद्धव हेच मुख्यमंत्री असावेत, असा आमदारांचा सूर आहे.मुख्यमंत्री आणि रिमोट कंट्रोलमुख्यमंत्रिपद हे पाच वर्षे शिवसेनेकडेच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातच मात्र, ज्या पद्धतीने काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकार स्थापनेसाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत ते बघता हे सरकार स्थिर राहील असे सध्याचे तरी चित्र आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्वत:कडे घेत सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.‘तो’ नंतरचा विषय आहे, मी योग्य निर्णय घेईनमुख्यमंत्रिपदी कोण असेल हे मी आताच सांगणार नाही. तो नंतरचा विषय आहे. मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, एवढेच उद्धव यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितले होते. मात्र, सायंकाळी झालेल्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी धरला. त्यानंतर उद्धव यांनी हे पद स्वीकारल्याचे समजते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना