शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

Maharashtra Government : संजय राऊतांचं फडणवीस-अजितदादांच्या सरकारवर नवं ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 7:57 AM

राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी काल बातमी आली आणि महाराष्ट्राच्या एकच खळबळ उडाली.

मुंबईः राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी काल बातमी आली आणि महाराष्ट्राच्या एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वळण लागलं. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी महाविकास आघाडीच्या संभाव्य सरकारला तिलांजली देण्याचाच प्रकार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अजित पवारांजवळ असलेलं 54 आमदारांच्या सह्याचं पत्र हे फसवणूक करून राज्यपालांना सादर केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं अजित पवारांना पक्षाच्या गटनेतेपदावरूनही हटवलं आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार अशी गर्जना करणाऱ्या संजय राऊतांना तोंडघशी पडावं लागलं. संजय राऊतांनी आता या सरकारला अपघाती सरकार असं म्हटलं आहे. या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथ ग्रहण प्रक्रियेला संजय राऊतांनी accidental शपथग्रहण!, असं संबोधलं आहे. तत्पूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊनही अजित पवारांवर आसूड ओढले होते. भाजपाने सत्ता आणि पैशांच्या जोरावर एका रात्रीत चित्र बदलले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. या घडामोडींमागे केवळ अजित पवारच आहे. शरद पवार यांचा यात कोणताही हात नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. शुक्रवारी रात्री 9पर्यंत अजित पवार आमच्यासोबत चर्चा करत होते. मात्र, ते नजरेला नजर भिडवून बोलत नव्हते. जो व्यक्ती पाप करणार असतो, तोच नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यानंतर ते अचानक गायब झाले. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.रात्रीच्या अंधारात राष्ट्रपती भवन खोलून त्यांनी राष्ट्रपती राजवट हटवली. मोदींच्या राजवटीत हे सारे होत असल्याचे आश्चर्य वाटते. कितीही चोरी लबाडी करा पण हिंमत असेल तर 30 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करून दाखवा. आज सकाळी अजित पवारांसोबत गेलेल्या आठ आमदारांपैकी पाच परत आले आहेत. त्या आमदारांचे अपहरण झाले होते ,असेच म्हणावे लागेल, असंही राऊत म्हणाले होते.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा