शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 16:46 IST

भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं.

मुंबईः भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं. गेल्या पाच वर्षांत ते कसं सरकार चालवत होते हे आपण पाहिलंच आहे. यापुढे भाजपाला नुसताच गोंधळ घालायचा असेल आणि वाद करायचा असेल तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही. त्या ठिकाणी योग्य प्रकारे उत्तर देऊ, असं नवनिर्वाचित आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं बहुमत सिद्ध केल्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्यांनी बातचीत केली आहे, त्यावेळी ते बोलत होते.गोंधळ त्यांनी घातला पण काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं हे आपल्यावर असतं. तिथं भाजपा किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील, त्यांनी पाच वर्षं आर्थिक दृष्टिकोनातून गोंधळ घातला. कामकाज ते चांगल्या पद्धतीनं चालवू शकले नाहीत, लोकांनीच त्यांना बाहेर काढलं. आता स्वतःहून पुढे येऊन नवीन मुख्यमंत्र्यांचं स्वागत न करता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान न ठेवता त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना हे दाखवायचं होतं की त्यांना किती आकडे कळतात. त्यांना किती कायदा कळतो. पण आम्ही 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्याचा अर्थ सर्वाधिक लोक हे महाविकास आघाडीकडे होते.असं असतानाही प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी शांत होता. त्या ठिकाणी शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडली. विधानसभेचा मान ठेवणं ही प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. उगाच कोणताही मुद्दा घेऊन कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू, आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आहोत. मुद्दा बाजूला ठेवून उगाच काही तरी बोलायचं ते काही योग्य नाही. भाजपा आमदारांना खुणवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते. परंतु असा प्रकार त्यांनी यापुढेही चालू ठेवल्यास आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना