Maharashtra Government: 'भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:18 IST2019-11-21T02:20:13+5:302019-11-21T06:18:05+5:30
' ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम'

Maharashtra Government: 'भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही'
सोलापूर : भाजप आणि शिवसेनेला हिंदुत्वाच्या आधारावरच जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही, असा दावा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. देशमुख म्हणाले की, ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम आहे़ त्यामुळे भाजपने सत्ता स्थापन करताना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह धरला आहे; मात्र शिवसेनेने अवाढव्य मागण्या केल्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यास विलंब झाला. सेना-भाजपने एकत्र आल्याशिवाय युतीतील तेढ सुटणार नाहीत. महायुतीने सत्तास्थापन न करून जनतेची घोर निराशा केली आहे.