शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Maharashtra Government: सिंचन घोटाळ्याचे गाडीभर कागद आम्ही केव्हाच रद्दीत विकले; खडसेंनी डिवचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:17 IST

भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

मुंबईः काल घडलेल्या राजकीय नाट्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीसांनी अजित पवारांबरोबर युती केल्याचं भाजपाच्या अनेक नेत्यांना रुचलेलं नव्हतं. भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे.पत्रकारांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीभर पुराव्यासंबंधी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, बैलगाडीभर आम्ही जे काही पुरावे गोळा केले होते, ते आम्ही केव्हाच रद्दीमध्ये विकले आहेत. त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता. खडसेंच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खडसे पुढे म्हणाले, 2014ला भारतीय जनता पार्टीकडून दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये सामूहिक निर्णय झाला. भारतीय जनता पक्षानं एकट्याच्या बळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत. जो निर्णय झाला, तो विरोधी पक्षनेता असल्यानं मी तेव्हा घोषित केला. हा निर्णय माझा स्वतःचा नव्हता, तर तो पक्षाचा निर्णय होता. त्या निर्णयाच्या अनुषंगानं जे काही चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ते सर्वांनीच पाहिलं. त्यानंतर ही चूक दुरुस्त करण्याचाही प्रयत्न झाला.सहा महिन्यांनंतर परत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली. युतीच्या माध्यमातून आम्ही साडेचार वर्षं सरकार चालवलं. महायुती पाहूनच जनतेनं आम्हाला मतदान केलं आणि स्पष्ट असे 161 जागांचं बहुमत दिलं. दुर्दैवानं या ठिकाणी मुख्यमंत्रिपद कोणाला, किती वर्ष पाहिजे या एका मुद्द्यावरून एकमत होऊ न शकल्यानं भाजपा आणि शिवसेना वेगवेगळी झाली. गेल्या महिन्याभरात जे काही झालं ते आपण पाहिलंच आहे. भाजपा तावडे, मेहता, बावनकुळेंसारख्या नेत्यांना सोबत घेऊन लढली असती तर आणखी 25 एक जागा भाजपाला जिंकता आल्या असत्या. मला डावलल्याची भावना आजही कायम असल्याचंही खडसे म्हणाले आहेत. मला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मी पक्षासाठी 42 वर्षे तपश्चर्या केली. पक्ष वाढावा यासाठी मेहनत घेतली. पण पक्षाच्या विस्तारासाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांनाच बाजूला करण्यात आलं, अशा शब्दांत खडसेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाAjit Pawarअजित पवार