शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: अजित पवारांनी 'त्या' बैठकीत दिले होते भाजपासोबत जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 16:16 IST

अजित पवारांच्या भूमिकेला ३ वरिष्ठ नेत्यांचं समर्थन

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आठ दिवसांपूर्वीच भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीनं भाजपासोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार द्यावं, अशी भूमिका १७ नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी मांडली होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेसोबत जाऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका मांडून त्यासाठी हालचाली सुरू केल्या, असं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची भूमिका मांडली होती. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अजित पवारांनी हे मत व्यक्त केलं होतं. या बैठकीनंतर लगेचच राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचे सूतोवाच केले. अजित पवारांसोबतच खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनीदेखील भाजपासोबत जाण्याची भूमिका मांडली. यापैकी तटकरे आणि मुंडे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. अजित पवारांनी मांडलेल्या भूमिकेला इतर नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेकडे फारसं लक्ष दिलं नाही. यानंतर शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीनं विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र शिवसेना आणि भाजपामधील दुरावा वाढताच शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्त्वाची भेट घेतली. शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केल्यास भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल, अशी भूमिका पवारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे मांडली. याला सोनिया गांधींनी हिरवा कंदील दाखवला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना