शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 13:41 IST

Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांचं ट्विट

मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला धक्का दिला आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान शक्य तितकं पुढे ढकलण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान दिनानिमित्त ट्विट केलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांचं ट्विट अतिशय सूचक मानलं जात आहे. लोकशाहीवर आधारित आजचा भारत घडवण्याचं काम आपल्या संविधानानं केलं आहे. आपलं भविष्य घडवण्यासाठीदेखील ते सहाय्यभूत ठरेल, असं ट्विट अजित पवारांनी केलं. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत घेण्याचे आदेश दिल्यानंतर १० मिनिटांत त्यांनी हे ट्विट केलं. राज्याच्या सत्ता संघर्षाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.  सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी जवळपास २७ तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.एका बाजूला भाजपाकडून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या घरवापसीसाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच पवार कुटुंबाकडूनही अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांना भावनिक साद घालत त्यांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं. मात्र अजित पवार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी वर्षावर निघून गेले. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता धूसर झाली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस