शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

Maharashtra Government: अजित पवारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडेंनी जाहीर केली भूमिका, सांगितलं 'ते' कुणासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 20:58 IST

Maharashtra Government: अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी सध्या चालू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडींनंतर आपलं मौन सोडलं आहे. अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यानंतर, लगेचच धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'मी राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार साहेबांसोबतच आहे, कुणी कोणताही संभ्रम निर्माण करू नये', असे मत ट्विटरवरुन धनंजय मुंडेंनी माडले आहे. त्यामुळे मुंडेंच्या भूमिकेतील चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला, असे म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं ट्विट केलं. एकीकडे राष्ट्रवादीकडून

अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले. तसेच, मी राष्ट्रवादीसोबतच कायम राहीन अन् शरद पवार हेच आमचे नेते असतील, असेही अजित पवारांनी ट्विट करुन म्हटलंय. अजित पवारांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या गटात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे, तात्काळ शरद पवारांनी ट्विट करुन अजित पवार हे संभ्रम निर्माण करत असल्याचं सांगितलं. तसेच, भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरणही शरद पवारांनी दिलंय. त्यानंतर, धनंजय मुंडेंनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, कुणीही संभ्रम निर्माण करू नये, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय. धनंजय मुंडे यांनी मौन बाळगल्यामुळे राष्ट्रवादीचीही धाकधूक वाढली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतः चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील ‘ट्विटर वॉर’नंतर धनंजय मुंडेंनीही त्यांची भूमिका जाहीर केली.

दरम्यान, शनिवारी सकाळीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या ट्विटचा सिलसिला सुरूच राहिला. अजित पवार यांनी एक धक्कादायक ट्विट केलंय. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असेही अजित पवारांनी म्हटलंय. त्यासोबच भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे