शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: अजित पवार पुन्हा येणार, उपमुख्यमंत्री होणार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:27 IST

अजित पवारांसोबत जयंत पाटील यांचं नावही उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच राज्याचं नेतृत्त्व करताना दिसेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं असलं तरी उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन भाजपासोबत गेलेल्या अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का, याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल. मात्र ते आज उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेणार नाहीत. अजित पवारांनी गेल्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. महाविकासआघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असताना अजित पवार यांनी थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या ३ दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राजीनामा दिला. त्यामुळे भाजपा सरकार कोसळलं. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावं यासाठी त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानं सध्या तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार नाही, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. सध्या उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतून जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे अतिशय विश्वासू मानले जातात. अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ते पक्षाचे विधिमंडळातले गटनेते होते. मात्र बंडखोरीनंतर राष्ट्रवादीनं त्यांची पदावरुन हकालपट्टी करत जयंत पाटील यांची नेमणूक केली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना