महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : 'सीसीटीएनएस' सर्चमध्ये देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 08:06 PM2020-12-15T20:06:45+5:302020-12-15T20:15:02+5:30

सीसीटीएनएस ही देशपातळीवर विकसित केलेली प्रणाली आहे

Maharashtra first in the country in 'CCTNS' search | महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : 'सीसीटीएनएस' सर्चमध्ये देशात प्रथम

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : 'सीसीटीएनएस' सर्चमध्ये देशात प्रथम

Next
ठळक मुद्देनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने दिल्लीत ही ऑनलाईन कॉन्फरन्स आयोजित

पुणे : गुड प्रॅक्टिसेस इन सीसीटीएनएस/आयसीजेएसच्या कॉन्फरन्समध्ये सीसीटीएनएसला इम्लिमेंटेशन ऑफ आय.सी.जे.एस ॲन्ड सीसीटीएनएस सर्च या वर्गवारी देशभरातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

पोलीस तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे या करता आय. सी. जे. एस व सीसीटीएनएस सर्च या प्रणालीची महत्वाची मदत होते. या प्रणालीच्या सहाय्याने महाराष्ट्र पोलिसांनी १५७३ गुन्हे उघडकीस आणले असून ७४३ चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध, ६९३ हरवलेल्या व बेवारस मृत्युंचा शोध लावला. त्याचबरोबर ७ हजार ८८३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही, ५०७ प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले आहे. त्याचबरोबर १३ हजार ७२१ व्यक्तींची पडताळणी करण्यात आली असून त्यात ४ हजार ६०१ व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंद असल्याचे मिळून आले आहे. एकूण १ लाख १७ हजार २६ पारपार्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणामध्ये २ हजार ८३७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके, उपमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संभाजी कदम, अपर पोलीस अधीक्षक नंदा पाराजे, उपअधीक्षक जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे, उपनिरीक्षक शशिकला काकरे, प्रमोद जाधव, पोलीस हवालदार जावेद खान, पोलीस कर्मचारी किरण कुलकर्णी, संदीप शिंदे, प्रियांका शितोळे, किर्ती लोखंडे यांनी केली.
........

याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे संगणक विभागातील पोलीस अधिक्षक संभाजी कदम यांनी सांगितले की, सीसीटीएनएस ही देशपातळीवर विकसित केलेली प्रणाली आहे. त्यात देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे. एखाद्या आरोपी अथवा व्यक्तीची पडताळणी करायची असले तर त्या व्यक्तीविरुद्ध देशभरात कोठे, कोणता गुन्हा दाखल आहे का याची माहिती एका क्लिकवर मिळते. त्याद्वारे गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीप्रमाणे शोध (एमओबी), शस्त्र परवाना, तसेच तपासामध्ये गुन्ह्यांची सध्यस्थिती याविषयीची माहितीची सुविधा या प्रणालीमध्ये अदययावत आहे.

गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपाेर्ट/ चारित्र्य पडताळणी, वाहनांबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणीची सर्व माहिती या प्रणालीवर उपलब्ध आहे. या प्रणालीचा देशभरात महाराष्ट्रातील पोलिसांनी गुन्हे तपासामध्ये सर्वाधिक वापर करुन गुन्हे उघड करण्यात यश मिळवले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने दिल्लीत ही ऑनलाईन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra first in the country in 'CCTNS' search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.