शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Result: शिवसेना, भाजपामधील चढाओढीवर आव्हाडांचं भाष्य

मुंबई: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना, भाजपामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळण्याची आठवण शिवसेनेकडून भाजपाला करून दिली जात आहे. तर मुख्यमंत्रिपदाबद्दल आम्ही कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असा पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा होत आला तरीही सत्ता स्थापनेचं घोडं अडलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा, शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आव्हाड यांनी दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युलादेखील दिला आहे. 'परिस्थितीची जाणीव नसलेले जेव्हा सत्तेच्या लालसेपोटी, केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून एकत्र आले आहेत. दोघांनी खुर्चीचे पाय धरले आहेत. दोन पाय यांनी धरले. दोन त्यांनी धरले.. नुसते ओढताहेत.. हे नाटक महाराष्ट्र पाहतोय.. त्यावरुन यांचं चारित्र्य महाराष्ट्राला कळतंय..,' अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना, भाजपावर केली आहे. शिवसेना, भाजपाची गाडी सध्या मुख्यमंत्रिपदावर अडकली आहे. त्याबद्दल आव्हाडांनी दोन्ही पक्षांना भन्नाट फॉर्म्युला दिला आहे. 'सोमवारी तुमचा मुख्यमंत्री करा. मंगळवारी त्यांचा करा.. बुधवारी तुमचा करा.. गुरुवारी त्यांचा करा.. शुक्रवारी तुमचा करा.. शनिवारी त्यांचा करा आणि उरलेला रविवार आठवले साहेबांना द्या.. आमचं काही म्हणणं नाही.. तुम्ही सरकार बनवण्याची जबाबदारी घेतली होती.. मात्र तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवत आहात,' अशा शब्दांत आव्हाडांनी महायुतीला टोला लगावला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस