Maharashtra Government: राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'वर चर्चा; टिकटॉक, भाऊ कदम अन् बरचं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 19:38 IST2019-11-17T19:37:52+5:302019-11-17T19:38:47+5:30
यंदाच्या निवडणुकीत सर्वात हिट ठरलेला डायलॉग म्हणजे माजी देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली

Maharashtra Government: राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'वर चर्चा; टिकटॉक, भाऊ कदम अन् बरचं काही
पुणे - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्यात पर्यायी सरकार बनविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत आज झाला. पुण्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख असे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते.
यंदाच्या निवडणुकीत सर्वात हिट ठरलेला डायलॉग म्हणजे माजी देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या वाक्याने सध्या सोशल मीडियात प्रचंड धूमाकूळ घातला आहे. मी पुन्हा येईन या वाक्याची चर्चा, मीम्स, जोक्स हे अनेक कार्यक्रमात वापरले जात आहे. राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणाबाजी केली. त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. अगदी सरकार बनविण्यासाठीही भाजपा असमर्थता दर्शविली आहे. शिवसेनेने सोडलेली साथ आणि भाजपाचं अल्पसंख्याबळ यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन हे वाक्य सगळ्यांसाठी विनोदाचं साधन बनलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन' चर्चा @NCPspeaks#MaharashtraGovtFormationpic.twitter.com/OsTmLoy8KY
— Lokmat (@MiLOKMAT) November 17, 2019
सोशल मीडियावर हे वाक्य जितकं जोरात व्हायरल होतयं त्याची चर्चा राजकीय बैठकीत झाली नाही तर नवलचं. राज्यातील सत्तास्थापनेसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही मी पुन्हा येईन यावर चर्चा झाली. अर्थात ही चर्चा ही विनोदाच्या स्वरुपाची होती. यात छगन भुजबळ म्हणतात की, पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रना घेऊन गेला हे ही बरं झालं. त्यावर जितेंद्र आव्हाड सांगतात की, टीकटॉक किती येतायेत त्यावर, एक म्हातारा माणूस म्हणतो, मी पुन्हा येईन, त्यावर एक जण म्हणतो येताना जरा नवटाक घेऊन ये तर जयंत पाटील यांनी नवटाक नव्हे तर चुना चुना घेऊन ये अशी दुरुस्ती करतात. तर बैठकीत एक जण आलाय की येणार आहे असं उच्चारतात. त्यावर धनंजय मुंडे लागलीच तो डायलॉग भाऊ कदमचाय असं सांगून मोकळं होतात. तसेच तो गेला बरं झालं, पाऊस पण थांबला असं सांगत बैठकीत हास्याचे फवारे उडतात.