शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:11 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघ आहेत, जिथे विद्यमान आमदार निवडणूक लढवत नाहीये. याची वेगवेगळी कारणे आहेत.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ३९ मतदारसंघांत एकही विद्यमान आमदार निवडणूक लढवत नसल्याने या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.  कुटुंबातील सदस्याला तिकीट मिळाल्यामुळे, पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे, आमदाराचे निधन झाल्यामुळे विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहिले नसल्याचे दिसून येते.

कोणत्या मतदारसंघात काय झाले?

- चोपडा (जळगाव) : पती उमेदवार; २०१९ मध्ये पत्नी उमेदवार होती.

- रावेर (जळगाव) : मुलगा (माजी शिक्षणमंत्री मधुकरराव यांचा नातू) रिंगणात

- एरंडोल (जळगाव) : मुलगा रिंगणात.

- अकोला पश्चिम (अकोला) : विद्यमान आमदाराचे निधन.

- वाशिम (वाशिम) : भाजपने तिकीट नाकारले.

- कारंजा (वाशिम) : विद्यमान आमदाराचे निधन; मुलगा शरद पवार गटातून निवडणूक लढवत आहे.

- दर्यापूर (अमरावती) : आमदार लोकसभेवर निवडून आले; काँग्रेसने ही जागा उद्धवसेनेला दिली.

- आर्वी (वर्धा) : भाजपने तिकीट नाकारले; देवेंद्र फडणवीस यांचे पीए येथे निवडणूक लढवत आहेत.

- काटोल (नागपूर) : मुलगा उमेदवार; पक्षाने सुरुवातीला अनिल देशमुखांना उमेदवार म्हणून घोषित केले होते.

- सावनेर (नागपूर) : सुनील केदार निवडणूक लढविण्यास अपात्र; पत्नी उमेदवार.

- उमरेड (नागपूर) : भाजपने तिकीट नाकारले; लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिला; पण पराभव.- नागपूर मध्य (नागपूर) : भाजपने तिकीट नाकारले.- कामठी (नागपूर) : भाजपने तिकीट नाकारले; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे निवडणूक लढवत आहेत.

- अर्जुनी-मोरगाव (गोंदिया) : अजित पवार गटाने तिकीट नाकारले; भाजपचे राजकुमार बडोले अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत.

- आमगाव (गोंदिया) : काँग्रेसने तिकीट नाकारले.

- गडचिरोली (गडचिरोली) : भाजपने तिकीट नाकारले.

- वरोरा (चंद्रपूर) : आमदार लोकसभेवर निवडून आले; भाऊ लढत आहे.

- आर्णी (यवतमाळ) : भाजपने तिकीट नाकारले.

- उमरखेड (यवतमाळ) : भाजपने तिकीट नाकारले.

- भोकर (नांदेड) : आमदार राज्यसभेवर नियुक्तर; मुलगी भाजपकडून निवडणूक लढवत आहे.

- लोहा (नांदेड) : पत्नी लढत आहे.

- फुलंब्री (छ. संभाजीनगर) : राजस्थानच्या राज्यपालपदी आमदाराची नियुक्ती; सक्रिय राजकारणातून निवृत्त.

- पैठण (छ. संभाजीनगर) : आमदार लोकसभेवर निवडून आले; मुलगा निवडणूक लढवत आहे.

- पालघर (पालघर) : शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेने तिकीट नाकारले.

- कल्याण पूर्व (ठाणे) : गोळीबारच्या घटनेनंतर आमदार तुरुंगात; पत्नी निवडणूक लढवत आहे.

- बोरिवली (मुंबई उ.) : भाजपने तिकीट नाकारले.

- जोगेश्वरी पूर्व (मुंबई उ.) : आमदार लोकसभेवर निवडून गेले; पत्नी निवडणूक लढवत आहे.

- अनुशक्ती नगर (मुंबई उ.) : आमदार मानखुर्द मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत; मुलगी येथे निवडणूक लढवत आहे.

- धारावी (मुंबई शहर) : आमदार लोकसभेवर निवडून गेल्या; बहीण उमेदवार.

- पारनेर (अहिल्यानगर) : आमदार लोकसभेवर निवडून आले; पत्नी निवडणूक लढवत आहे.

- श्रीगोंदा (अहिल्यानगर) : मुलगा निवडणूक लढत आहे; पूर्वीच्या आमदाराची पत्नी उमेदवार होती.

- माढा (सोलापूर) :     शरद पवार गटाने तिकीट नाकारले; मुलगा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.

- सोलापूर शहर मध्य : आमदार लोकसभेवर निवडून आले.

- करवीर (कोल्हापूर) : आमदाराचे निधन; मुलगा राहुल पी. एन. पाटील निवडणूक लढवत आहेत.

- कोल्हापूर उत्तर (कोल्हापूर) : आमदाराचे निधन; पोटनिवडणुकीत पत्नी विजयी पण तिकीट नाकारले; आता महाविकास आघाडीचा उमेदवार नाही.

- इचलकरंजी (कोल्हापूर) : मुलगा निवडणूक लढवत आहे.

- खानापूर (सांगली) : मुलगा निवडणूक लढवत आहे.

- तासगाव (सांगली) : मुलगा निवडणूक लढवत आहे.

- चिंचवड (पुणे) : आमदाराची माघार, दीर निवडणूक लढवत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना