शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 07:04 IST

Maharashtra Vidhan Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी चंद्रपूरच्या चिमूर व अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे जाहीर सभा घेतील.

नागपूर : निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी विदर्भावर फोकस केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भात दाखल होऊन प्रचारात जोश भरत आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला विदर्भ पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी विशेष रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, हे ध्यानात ठेवूनच शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारण्यासाठी काँग्रेस नेत्यांची फौज विदर्भात उतरली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे हे रविवारी उत्तर नागपुरात जाहीर सभा घेणार आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी चंद्रपूरच्या चिमूर व अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे जाहीर सभा घेतील. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी रविवारी विदर्भात येत आहेत. गडचिरोलीच्या वडसा येथे जाहीर सभा घेऊन पश्चिम नागपूर येथे आयोजित ‘रोड शो’मध्ये सहभागी होणार आहेत. 

संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, विदर्भाचे वरिष्ठ निरीक्षक मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महासचिव अविनाश पांडे हे सर्व नेते नागपुरात दाखल झाली. हरयाणाच्या काँग्रेस आमदार विनेश फोगाट यांनीही नागपुरात सभा घेतली. 

बंडखोरांशी ज्येष्ठ नेत्यांचा संपर्क 

ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा बंडखोरांशी संपर्क साधत असून त्यांची समजूत काढत आहेत. आजवर काँग्रेसनिष्ठा जपली, आताही वेळ गेलेली नाही, उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसला समर्थन जाहीर करण्याचा आग्रह धरून भविष्यात काँग्रेस तुम्हाला न्याय देईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते देत आहेत.

भाजपचाही विदर्भावर ‘फोकस’ 

विधानसभा निवडणुकीच्या मतदाना अगोदरचा शेवटच्या रविवारी विदर्भात प्रचारसभांचा धुरळा उडणार आहे. भाजप व महायुतीकडून प्रचाराच्या ‘सुपर संडे’त विदर्भावर विशेष ‘फोकस’ करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मोठे नेते व पदाधिकाऱ्यांच्या सभा व दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित शहा यांची रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल व सावनेर मतदारसंघांत दुपारी सभा होणार आहे. तत्पूर्वी गडचिरोली व वर्धा येथेदेखील त्यांच्या सभा होतील. 

रविवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेदेखील प्रचारासाठी नागपुरात येणार आहेत. यावेळी ते राजस्थानी नागरिक संमेलनात सहभागी होतील. तसेच नागपूर पश्चिम मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होणार आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची दुपारी बल्लारपूर येथे जाहीर सभा होणार आहे. तर नागपूर पश्चिममध्ये कंगना राणाैत यांचा ‘रोड शो’ होईल. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा