शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:25 IST

काँग्रेसचे नेते दिल्लीत मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात बैठकींचा सिलसिला, पडद्यामागून काय चाललंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीत सातत्याने जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. परंतु अद्याप जागावाटप जाहीर झालं नाही. त्यातच मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र पुढे आले आहे. राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं विधान संजय राऊतांनी केले होते. तर उद्धव ठाकरेंपेक्षासंजय राऊत हे मोठे नेते असतील असा पलटवार काँग्रेसनं केला. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. अशावेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांची तातडीने बैठक बोलावली होती. 

जवळपास २ तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीला गेले. या भेटीला जायच्या आधी संजय राऊतांनी माध्यमांना म्हटलं की, सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यात काँग्रेसचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्या काही छोट्या मोठ्या चर्चा आहेत. त्या आज आम्ही पूर्ण करू. यशवंतराव चव्हाण सेंटरला आमची भेट होईल. तिथे आम्ही एकत्रित चर्चा करू. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील जे रखडलेले विषय आहेत ते संपवण्याचा आज प्रयत्न करू. मातोश्रीवरील बैठकीत आम्ही जे काही निर्णय घेतलेत, ते योग्य वेळी लवकरच जाहीर होतील असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय काँग्रेसला सोडून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र लढणार अशी चर्चा सुरू आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊतांनी सूचक भाष्य केले. माध्यमांनी बनवलेली ही स्टोरी आहे, ती तुमच्यापर्यंतच ठेवली पाहिजे. या स्टोरीला काय कंगोरे फुटतात का पाहा. लोकांना पाहायला मज्जा येते. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा का होऊ नये? महाविकास आघाडीच्या जवळपास १५ बैठका झाल्या आहेत. आम्ही ३४० तास चर्चा केलीय. पेच सुटेल असं भाष्य संजय राऊतांनी केले आहे. 

विदर्भातील १२ जागांवरून संघर्ष

महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यात आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. लोकसभेला ठाकरे गटाने रामटेक आणि अमरावती ही जागा काँग्रेसला सोडली होती. त्या बदल्यात विधानसभेला विदर्भात काही जागा मिळतील अशी ठाकरे गटाची अपेक्षा होती. मात्र विदर्भातील १२ जागांवर ज्याठिकाणी विद्यमान मविआचे आमदार नाहीत या जागांवर दोन्ही पक्षातील तिढा वाढलेला आहे.

कोणत्या १२ जागांवरून वाद?

आरमोरी - कृष्णा गजबे, भाजपा आमदारगडचिरोली - देवराल होली, भाजपा आमदारगोंदिया - विनोद अग्रवाल, अपक्ष आमदारभंडारा - नरेंद्र भोंडेकर - अपक्ष आमदारचिमूर - किर्तीकुमार भांगडिया, भाजपा आमदारबल्लाळपूर - सुधीर मुनगंटीवार,भाजपा आमदारचंद्रपूर - किशोर जोरगेवार, अपक्ष आमदाररामटेक - आशिष जयस्वाल, अपक्ष आमदारकामठी - टेकचंद सावरकर, भाजपा आमदारदक्षिण नागपूर - मोहन माते, भाजपा आमदारअहेरी - धर्मरावबाबा आत्रम, अजित पवार गट आमदारभद्रावती वरोरा - प्रतिभा धानोरकर ज्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यात. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस