Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 06:00 PM2019-10-19T18:00:24+5:302019-10-19T18:02:28+5:30

Maharashtra Election 2019: पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती,

Maharashtra Election 2019: 'Your nephew speaks the language of ***, so why is it our fault?' udayanraje bhosale questioned sharad pawar | Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार पावसात सभेला संबोधित केले. पवारांची साताऱ्यात मुसळधार पावसातील सभा देशभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालं. पण, उदयनराजे भोसलेंनी आपल्या प्रचाराच्या सांगता सभेतून पवारांच्या सभेचा आपल्या शब्दात समाचार घेतला. 

पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती, ती चूक दूरुस्त करण्याची वेळ आली असून घराघरातील तरुण वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना, साहेब चुकीची भाषा बोलतायंत, तर आता आमचंही ऐका, असे म्हणत उदयनराजेंही पवारांवर बरसले. चूक तुम्ही नाही, निवडणुकीत चूक आम्ही अन् जनतेनं केली. आमच्या सांगण्यावरुन, विनंत्यावरुन तुम्हाला मत दिली ही आमची चूक होती का? लोकसभेला चौघे निवडणूक आले अन् उर्वरीत जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले ही आमचीच चूक होती का?. गेल्या 50 वर्षांच्या राजकारणात भगव्या झेंड्याची आठवण आत्ताच कशी आली? सिंचनापासून महाराष्ट्र वंचित ठेवला, ही आमचीच चूक होती का?. पवारसाहेब, तुमचा पुतण्या *** ची (धरणातील विधानावरुन) भाषा करतो अन् तुम्ही सावरुन घेता ही आमची चूक होती का?. दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही तोंडाला पाने पुसली ही आमची चूक आहे का?. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार केवळ 1 मताने पाडले अन् देशाला लाखो कोटी रुपयांचा भुर्दंड बसला ही आमची चूक होती का?

मराठा आरक्षणासाठी समाजाची 50 वर्षे फरफट केली, ही आमची चूक होती का? राज्य शिखर बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला ही आमची चूक होती का?. कलम 370 ला तुम्ही विरोध केला आणि शहीद कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळलं ही आमची चूक होती का? असे म्हणत उदयनराजेंनी पवारांना लक्ष्य केलं. आम्ही कौरवांच्या टोळीतून बाहेर पडलो अऩ् पांडवांच्या सोबत उभे राहिलो, तुम्ही उभारणार असाल तर मी निवडणूक लढवणार नाही, आम्ही ज्येष्ठांचा आदर करतो? ही आमची चूक आहे का?. पडलेला पाऊस हा शुभ शकून नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घाण धुवून टाकण्याची सुरूवात झाल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय. साताऱ्यातील सभा म्हणजे जनतेला काळू-बाळूचा तमाशा वाटला. या तमाशात ढगाला लागली कळ, काँग्रेस राष्ट्रवादीची मत गळ. आणि धनुष्यबाण-कमळाची मतं फुलं, असंच म्हणाव लागेल, असे उदयनराजेंनी म्हटलं. उदयनराजेंनी कागदावर भाषण लिहून आणलं होतं, ते भाषण वाचून दाखवताना पवारांना ती माझी चूक आहे का? असा प्रतिप्रश्न पवारांना केलाय.

Web Title: Maharashtra Election 2019: 'Your nephew speaks the language of ***, so why is it our fault?' udayanraje bhosale questioned sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.