शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
4
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
5
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
6
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
8
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
11
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
12
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
13
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
14
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
15
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
16
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
17
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
18
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
19
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
20
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही ‘अधिकृत आमदार’ केव्हा होणार?; निर्वाचित लोकप्रतिनिधींची विचित्र कोंडी

By अतुल कुलकर्णी | Updated: November 17, 2019 06:23 IST

विधानसभा गठित होण्याची प्रतीक्षा; तब्बल ११० लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आले आहेत निवडून

- अतुल कुलकर्णी मुंबई : आम्हाला लोक आमदार तरी म्हणतील का? आम्ही आमदारकीची शपथ कधी घेऊ शकतो? विधानसभेत आम्हाला कधी जाता येईल? असे अनेक प्रश्न सध्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारत आहेत. सगळ्या पक्षांचे मिळून तब्बल ११० लोकप्रतिनिधी पहिल्यांदा निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी अनेकांनी विधानसभेचे सभागृह फक्त बाहेरुनच पाहिले आहे.आपण कधी ‘आमदार’ होणार असा प्रश्न या लोकप्रतिनिधींना पडलेला असताना दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठी आधी विधानसभा गठित व्हावी लागेल, ती झाल्याशिवाय कोणत्याच पक्षाला काहीही करता येणार नाही. कोणत्या तरी पक्षाने आपल्याकडे बहुमत आहे हे सांगून सरकार स्थापन करण्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगावे लागेल.हे बहुमत फक्त विधानसभेच्या सभागृहात सिद्ध करता येते. त्यासाठी आधी विधानसभा गठित करावी लागेल. त्यानंतर राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष नेमतील. ते हंगामी अध्यक्ष नवनियुक्त सदस्यांना सभागृहात शपथ घेतील. शपथ घेतल्यानंतरच ते विधानसभेचे सदस्य होतील आणि विधानसभेचे सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाईल. ती निवड झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाजास सुरुवात होईल आणि त्यावेळी ज्यांनी कोणी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला असेल त्यांना सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.अध्यक्षाची निवड जर बिनविरोध झाली तर मुख्यमंत्र्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठीची प्रक्रिया हा औपचारिक भाग ठरतो. मात्र सत्ताधारी पक्षाने अध्यक्षपदासाठी उभा केलेला उमेदवार पराभूत झाला तर सरकारकडे बहुमत नसल्याचे दिसून येईल. अन्यथा राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी पाचारण केलेल्या नेत्यास आपले बहुमत स्वतंत्रपणे पुन्हा सिद्ध करावे लागेल.एकदा अध्यक्ष निवडला गेला की ज्या कोणत्या पक्षाला दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे असतील, किंवा ज्या पक्षातल्या आमदारांना वेगळा गट करायचा असेल तर त्यांना त्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतियांश सदस्यांची गरज भासेल. तेवढे सदस्य असतील तर त्यांना नव नियुक्त अध्यक्षांकडे आम्हाला वेगळा गट करायचा आहे, अशी मागणी करावी लागेल. अध्यक्षांनी त्यांना तशी परवानगी दिली तरच ती फूट अधिकृत धरली जाते. त्यानंतर तो गट त्यांच्या पैकी एकाची गटनेता म्हणून निवड करु शकतो आणि तो गट अन्य कोणत्या पक्षात ही विलीन केला जाऊ शकतो किंवा स्वत:चे वेगळे अस्तित्व ठेवूनही काम करु शकतो.प्रतोदांचा आदेश असेल तर...?व्हीप म्हणजे प्रतोद. प्रतोदाची निवड पक्ष करतो. एखाद्या विषयावर विधानसभेत किंवा विधानपरिषदेत मतदान घेतले जाणार असेल तर ते मतदान कोणत्या बाजूने करायचे याचा आदेश प्रतोदांच्या स्वाक्षरीने काढला जातो. तो आदेश आमदारांनी पाळला नाही तर त्या सदस्यांच्या विरोधात अध्यक्ष किंवा सभापतींकडे प्रतोदांना तक्रार करता येते. ही तक्रार अर्धन्यायिक स्वरुपाची असते. त्यावर अध्यक्ष/सभापती निर्णय देतात. आदेशाच्या विरुद्ध मतदान करणाऱ्यांचे सदस्यत्व यात रद्द होऊ शकते. त्यामुळे असे आमदारांना पुन्हा निवडून येईपर्यंत किंवा संबंधीत विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत कोणतेही लाभाचे पद किंवा मंत्रीपदही स्वीकारु शकत नाहीत.कोणाचे दोन तृतीयांश, किती होतील?पक्ष          एकूण सदस्य  दोन तृतीयांश    भाजप           १०५                ७०शिवसेना        ५६                 ३७राष्ट्रवादी         ५४                 ३६काँग्रेस           ४४                  २९

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस