शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधारणार नाही, संदेश पारकरांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 13:45 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजपाने कणकवली मतदासंघातून नितेश राणेंना उमेदवारी दिल्याने बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश करणारे कणकवलीतील नेते आणि नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी नितेश राणे आणि नारायण राणेंवर बोचरी टीका केली आहे.

मुंबई - भाजपाने कणकवली मतदासंघातून नितेश राणेंना उमेदवारी दिल्याने बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश करणारे कणकवलीतील नेते आणि नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी नितेश राणे आणि नारायण राणेंवर बोचरी टीका केली आहे. ''नितेश राणेंना भाजपाच्या शाळेत दाखल करून संयमाचे धडे देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधरणार नाही,''असा टोला पारकर यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी कोकणातील कणकवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा यांच्यात सामना रंगला आहे. भाजपाने येथे नितेश राणेंना उमेदावारी दिल्याने शिवसेनेने युतीधर्म बाजूला ठेवत सतीश सावंत यांना उमेदवारी दिला आहे. दरम्यान, सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा बुधवारी कणकवलीत झाली. यावेळी नितेश राणेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या संदेश पारकर यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी संदेश पारकर यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर जोरदार टीका केली. ''पराभवाची चाहूल लागल्याने सध्या नारायण राणेंच्या घरी शुकशुकाट पसरला आहे. परवा नितेश राणेंबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना भाजपाच्या शाळेत दाखल करून संयमाचे धडे देणार असल्याचे सांगितले. मात्र नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधरणार नाही, असे संदेश पारकर म्हणाले. संदेश पारकर यांनी यावेळी नारायण राणेंवरही टीकेचे प्रहार केले.''नारायण राणे भाजपात आल्याने भाजपाला डबल इंजिनची ताकद मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र नारायण राणेंचे कोळसा संपलेले बंद पडलले इंजिन घेऊन भाजपा निघाली आहे. राणेंचे राजकीय मूल्य संपले आहे. त्यामुळे राणेंचे बंद पडलेले इंजिन भाजपासाठी अपशकून ठरेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू;  मुख्यमंत्री नितेश राणे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर आक्रमकतेबाबत संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीमधील प्रचारसभेत म्हटले होते. संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टीकणकवली मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार असताना विरोधी उमेदवाराचा प्रचार करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचेसंदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी बुधवारी दिली . 

Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

Maharashtra Election 2019 : एकतर्फी लढतीत बंडखोर अपक्षांनी भरले रंग, कुणाचा होणार बेरंग

Maharashtra Election 2019: सावंतवाडीत बंडखोर गणित बिघडवणार की केसरकर विजयाची हॅट्ट्रिक साधणार?

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीNitesh Raneनीतेश राणे Sandesh Parkarसंदेश पारकर