शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 10:05 AM

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत- संजय राऊत

मुंबई: अस्थिर परिस्थितीत यंत्रणा हाती असलेल्यांकडून फोडाफोडीचे प्रयत्न होतात. मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेना आमदारांच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं वैयक्तिक वैर नाही. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सत्ता स्थापनेसाठी काही जणांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधला जात आहे, असा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावर शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क करण्याची हिंमत कोणीही करणार नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. त्यामुळे त्यांच्या वाऱ्यालाही कोणी उभं राहणार नाही. अस्थिरतेच्या काळात सत्ताधारी विविध हातखंडे वापरतात. मात्र शिवसेनेचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी विनाकारण विधानं करत नाहीत. माझा तो स्वभाव नाही. मी फक्त पक्षाची भूमिका मांडतो, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. मला ना मंत्री व्हायचंय, ना मुख्यमंत्री. मला वैयक्तिक अशी कोणतीही अपेक्षा नाही. मी केवळ शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतो, असं राऊत म्हणाले. भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच 'गुड न्यूज' मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मुनगंटीवार वारंवार गुड न्यूज गुड न्यूज करत असतील, तर कोण कुठे जन्माला आलंय ते पाहावं लागेल, असा टोला त्यांनी लगावला. सुधीर मुनगंटीवार शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी घेऊ शकतात, असंही राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार