शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरलेले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? जयंत पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:55 IST

मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय?

जळगाव: मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय? मुख्यमंत्र्यांनी तर महाजनादेश यात्रेनिमित्त संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. त्यामुळे जर त्यांना विरोधकच दिसत नसतील तर सरळ घरी बसा, आपोआप निवडून याल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवार, ११ रोजी सकाळी आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांवर केली.ते म्हणाले की, सत्ताधा-यांना विरोधी पक्षांची भीती वाटतेय, शरद पवार नावाची भिती वाटतेय. म्हणून प्रत्येक सभेमध्ये अमित शहा हे शरद पवार व राष्ट्रवादीला टारगेट करताय. याचाच अर्थ राष्ट्रवादी पक्ष भाजप-सेनेचा समर्थपणे प्रतिकार करतेय.महाजनांनी स्वत:ची जागा टिकवली तरी आश्चर्य वाटेल‘राष्ट्रवादीचे लोक एसीत बसून सर्वेक्षण करतात त्यामुळे त्यांना परिस्थितीचा अंदाज येत नाही’ अशी टीका गिरीश महाजन यांनी केली असल्याबाबत विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले की, आता ५ वर्ष एसीत कोण बसलय?. राज्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी प्रकरणी घेतलेल्या भूमिकेनंतर युवा वर्गाकडून तसेच जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व जागा निवडून येतील, असे सांगण्याची वेळ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली आहे. मात्र त्यांनी स्वत:ची जागा टिकवली तरी मला आश्चर्य वाटेल, अशी बोचरी टीका त्यांनी केली.ईडी व आयटी मागे लावण्यात मुख्यमंत्री व्यस्त‘मुख्यमंत्री म्हणतात की राज्यात विरोधकच उरलेले दिसत नाहीत.’ या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांना स्वत:च्या पक्षात घेणे व त्यासाठी ईडी व आयटी मागे लावणे यातच मुख्यमंत्री व्यस्त असल्याने त्यांना राज्यात वेगळ काही करता आलेले नाही. जे विरोधक संघटीतपणे त्यांना विरोध करताय त्यांच्यामागे राज्यातील लोक उभे राहिलेले दिसत आहेत. प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे असे विधान करून ते विरोधकांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र निकालानंतर त्यांच्या लक्षात येईल की मुख्यमंत्र्यांच्या पक्षापेक्षा विरोधकांची ताकद विधानसभेत जास्त असेल.बंडखोरांवर कारवाई करणारजर पक्षाने तडजोड केली तर तडजोड आणि कार्यकर्त्याने केली तर बंडखोरी असे धोरण योग्य आहे का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, पक्षाने केलेली तडजोड ही पक्षहितासाठी धोरण ठरवून केलेली असते. त्याची तुलना बंडखोरांच्या तडजोडीशी होऊ शकत नाही. पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.चंद्रकांत पाटील पुरात वाहून आलेले त्यांना गांभीर्याने घेत नाहीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण संपलेले असेल, असे विधान केले असल्याबाबत विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे पुरात पुण्याला वाहून आलेले उमेदवार आहेत. वाहून आलेला उमेदवार नको, अशी पुण्यातील मतदारांची भूमिका आहे. त्यांनी पवारांच्या राजकारणावर वक्तव्य करावे, हे कुणी फार गांभीर्याने घेते असे मला वाटत नाही, अशी टीका केली.सरकार आर्थिक संकटात असल्याने खाजगीकरणाचा मार्गएमटीएनएल, बीएसएनएल बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता रेल्वेच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, राज्यासोबतच केंद्र सरकारही आर्थिक संकटात आहे, त्यातून खाजगीकरणाचा मार्ग अवलंबला जात आहे. बीएसएनएल व एमटीएनएलचे गेल्या दोन वर्षांपासून जिओसाठी खच्चीकरण सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा