शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Maharashtra Election 2019: अहो मी पतंग उडवित होतो...; 'डान्सिंग' व्हिडीओवर ओवेसींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 7:58 PM

ओवेसींचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

औरंगाबाद: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जिन्यावरुन उतरत असलेले व्हिडीओ गाण्यावर नाचत असताना दिसत होते. या डान्सवर आता ओवेसींनी खुलासा केला आहे. आपण नाचत नव्हतो. तर पक्षाचं चिन्ह असलेल्या पतंगाचा अभियन करून दाखवत होतो, असं ओवेसी म्हणाले. सभेला उपस्थित असलेल्यांना मी पतंग उडवण्याचा अभिनय करून दाखवत होतो. कारण माझ्या पक्षाचं निवडणूक चिन्ह पतंग आहे, असं ओवेसी यांनी सांगितलं. 'माझ्या पक्षाचं चिन्ह पतंग आहे. आमच्या प्रत्येक सभेनंतर आम्ही पतंग उडवण्याचा अभिनय करून निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, असा प्रयत्न करतो. कोणीतरी नेमका तेवढाच भाग एडिट केला आणि त्यावर गाणं लावून तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर काहींनी मी नाचत असल्याचं वृत्त दिलं. मात्र त्यात तथ्य नाही', अशा शब्दांत ओवेसींनी स्पष्टीकरण दिलं.  औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात शुक्रवारी एमआयएमची सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावरुन खाली उतरत असताना ओवेसींनी पतंग उडवण्याचा अभिनय करुन दाखवला. राज्यात एमआयएमचा एकच खासदार आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील लोकसभेत औरंगाबादचं नेतृत्त्व करतात. जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा आहेत. अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबाद शहरात शिवसेना-भाजप युतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत एमआयएम पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. यातील औरंगाबाद मध्य मतदारसंघ एमआयएमसाठी महत्त्वपूर्ण आहे. मागील निवडणुकीत एमआयएमने हा मतदारसंघ सेनेकडून हिसकावून घेतला होता. यंदा मतदारसंघ परत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन