Maharashtra Election 2019 family cast its vote after immersing ashes in badlapur | महाराष्ट्र निवडणूक २०१९: अस्थी विसर्जन करून कुटुंब पोहोचलं मतदानाला

महाराष्ट्र निवडणूक २०१९: अस्थी विसर्जन करून कुटुंब पोहोचलं मतदानाला

बदलापूर : बदलापूर वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचं 19 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या अस्थीचं विसर्जन करुन लागलीच म्हात्रे कुटुंबियांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. घरात दु:खाचं वातावरण असतानाही म्हात्रे कुटुंबियांनी मतदान केलं. 

बदलापूर वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचं 19 ऑक्टोबर रोजी वृद्धापळानं निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यावर त्यांच्या अस्थी विसर्जनाचं कार्य करुन लागलीच म्हात्रे कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं आपला मतदानाचा हक्क बजावला. बदलापूर शहरातर विक्रमी मतदानासाठी राजकीय पक्ष आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले होते. त्याचाच प्रत्यय आज वडवली भागात दिसला. पांगळू म्हात्रे यांच्या मुलांनी आणि पुतण्यांनी अस्थी विसर्जन उरकल्यावर मतदान केंद्र गाठलं. त्यांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्कदेखील बजावला. यावेळी त्यांच्या घरातील महिलांनीदेखील मतदान केलं. घरातील दु:खाचं सावट बाजूला सारुन या कुटुंबानं मतदानासाठी दिलेला वेळ हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. 

Web Title: Maharashtra Election 2019 family cast its vote after immersing ashes in badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.