शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:07 IST

भाजपानं चौथ्या यादीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे.

मुंबईः भाजपानं चौथ्या यादीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ खडसेंनीच पूर्णविराम दिला आहे. रोहिणी खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार कोण असेल याबद्दल आपल्याला उत्सुकता होती.जवळपास 40 वर्षांपासून आपण भाजपासाठी काम करत आलो आहोत. तुम्ही सर्वांनी यासाठी सहकार्य केलेले आहे. आतापर्यंत भाजपाच्या आदेशाचं आपण तंतोतंत पालन केलेलं आहे. भाजपानं सांगितलं तेव्हा एक मिनिटांत मी मंत्रिपद सोडलं. पक्ष बदनाम होईल असं कोणतंही काम केलेलं नाही. कार्यकर्त्यांचं म्हणणं वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवलेलं आहे. निर्णय कटू असले तरी स्वीकारत आलो. आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. 

पक्षानं रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून तिकीट दिलेलं आहे. मला मिळालेलं सहकार्य रोहिणी खडसेंनाही मिळेल, अशी मी आशा व्यक्त करत असल्याचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे म्हणाले. रोहिणीताई आणि भाजपाच्या उमेदवाराला कष्ट करून आपल्याला निवडून आणायचं आहे. काही अडचणी पक्षासमोरही असतात. त्यामुळेच उमेदवारीसाठी विलंब लागला असेल, पण उशिरा का होईना भाजपानं आमच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला आहे. आपल्याच माणसाला तिकीट मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासारखंच रोहिणीताई तुम्हाला अधिक प्रेम देण्याचा प्रयत्न करतील. सर्वांनी एकजुटीनं, एकदिलानं रोहिणीताईंना सहकार्य करावं, असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019