शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; ३ पक्षांच्या नेत्यांची राज्यपाल भेट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:21 IST

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणे योग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली.

- अतुल कुलकर्णी मुंबई : शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणेयोग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी सायंकाळी पुण्यात खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानंतर, रात्री पवार दिल्लीला जातील.लोकसभेचे अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे. सोनिया गांधी व शरद पवार यांची भेट रविवारी होणार अशा बातम्या माध्यमांमधून आल्या. मात्र, अशी बैठक ठरलीच नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, सोमवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, के. सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, तसेच खा. शरद पवार यांच्यासह खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे यांची बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीसाठी पुण्यात राष्टÑवादीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे.त्यानंतर, सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बैठकीबद्दल निर्णय होईल, असे समजते. या बैठकांनंतरच सत्तास्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत जाण्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. गेल्या दोन दिवसांत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांशी झालेल्या बैठकांच्या छायाचित्रांवरून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. राज्यातील काँग्रेस आमदार लवकर निर्णय घ्या, असा दबाव वाढवत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार