Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या 'चंपा'वर चंद्रकांत पाटलांचं 'मनसे' उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 09:56 PM2019-10-15T21:56:32+5:302019-10-15T22:10:22+5:30

राज यांनी जाहीर सभेत चंद्रकात पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला होता

Maharashtra Election 2019 Chandrakant Patil reacts on mns chief raj thackerays champa comment | Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या 'चंपा'वर चंद्रकांत पाटलांचं 'मनसे' उत्तर; म्हणाले...

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या 'चंपा'वर चंद्रकांत पाटलांचं 'मनसे' उत्तर; म्हणाले...

Next

मुंबई: विधानसभा निवडणुकीत आम्ही चंपाची चंपी करणार, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील प्रचारसभेत केलं होतं. राज यांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे प्रत्युत्तर दिलं आहे. राज यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. त्यांनी त्यांचा स्वतंत्र बाणा जपायला हवा. चंपा हा शब्द सर्वप्रथम अजित पवार यांनी वापरला होता. तोच शब्द न वापरता राज यांनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं, असं पाटील म्हणाले.

Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप

राज ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भाषा बोलतात, असा आरोप भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आला होता. तसाच काहीसा आरोप चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचा उल्लेख करत केला. 'अजित पवार यांनी सर्वप्रथम माझा उल्लेख चंपा असा केला. राज यांनीदेखील तोच शब्द वापरला. राज यांनी काहीतरी नवं बोलावं. तीच भाषा बोलू नये. कदाचित राज यांचा शब्दसंग्रह कमी पडला असावा. पण ते काहीही बोलले असले, तरी मी त्यांच्या पातळीवर येणार नाही,' असं पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 

Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल?

राज ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना स्वत: केलेल्या कामांची यादीच सादर केली. 'राज ठाकरे, अजित पवार माझी खिल्ली उडवतात. मात्र मी किती कामं केली आहेत, याची लोकांना कल्पना आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसारखे प्रश्न मी हाताळले. मतदारांना याबद्दल माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांना जनताच वेड्यात काढेल,' असंदेखील पाटील पुढे म्हणाले. 

Web Title: Maharashtra Election 2019 Chandrakant Patil reacts on mns chief raj thackerays champa comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.