Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 09:49 PM2019-10-15T21:49:52+5:302019-10-15T21:51:18+5:30

चंद्रकात पाटील यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांच्या प्रचारदौऱ्याचे, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Maharashtra election 2019 : 'Sharad Pawar is hugely racist', blaming chandrakant Patil in enterview | Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप

Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप

Next

संभाजीराजेंनी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी संभाजीराजे पेशव्यांसोबत गेले, असे पवार यांनी म्हटल्याचे सांगत पवार हे जातीयवादी असल्याचं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. भाजपाचे सर्वच नेते, विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संभाजीराजेंचं उभे राहून अभिनंदन केलं होतं. भाजपाकडून कधीही तसा तोरा वापरण्यात येत नाही. पण, पवारांकडून नेहमीच जातीयवाद केला जातो. पवार प्रचंड जातीयवादी आहेत, असे पाटील यांनी म्हटलंय.

चंद्रकात पाटील यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांच्या प्रचारदौऱ्याचे, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पण, पवार हे प्रचंड जातीयवादी असल्याची टीकाही पाटील यांनी केली. तसेच, पवारांनी हातवारे केले हे अतिच होत आहे. यापूर्वीही त्यांनी उखडलंय का, असे म्हटले होते. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना हे शोभत नाही, असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना चंपा या विधानाविषयी विचारले असते, ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग आहे. अजित पवारांना, मी याबाबत काहीही बोलणार नाही. पण, राज ठाकरेंनी नवीन नाव शोधायला पाहिजे होते, राज ठाकरे हे अतिशय हुशार आणि क्रिएटीव्ह व्यक्ती आहेत. राज यांचं नेतृत्वही महाराष्ट्रात चांगलंय. मी त्यांना कॉलेजपासून ओळखतो, ते माझे चांगले मित्र आहेत. ते मला मित्र समजतात की नाही, हे मला माहित नाही, ते खूप मोठे नेते आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. 

Web Title: Maharashtra election 2019 : 'Sharad Pawar is hugely racist', blaming chandrakant Patil in enterview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.